Saturday, October 25, 2025
Homeमहाराष्ट्रनिनाई परळेत दाम्पत्याचा रहस्यमय मृत्यू ; हल्ला की घातपात?

निनाई परळेत दाम्पत्याचा रहस्यमय मृत्यू ; हल्ला की घातपात?

निनाई परळे पैकी गोलीवने वसाहत तालुका शाहुवाडी येथील निनू यशवंत कंक वय (70 ) व रखुबाई निनू कंक या पती-पत्नींचा जंगल परिसरात विचित्र अवस्थेत मृतदेह आढळून आला..

वाघ सदृश्य प्राण्याच्या हाल्यातच या दांपत्याचा मृत्यू झाल्याचा दावा स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.. तर कोणत्याही वनप्राण्यांन हा हल्ला केला नसल्याचा दावा वन विभागाकडून केला जातोय.. त्यामुळे हा हल्ला आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त केला जात असून याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे…

 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, निनाई परळे पैकी गोलीवने वसाहतीतील नीनू कंक यांचे गावापासून काही अंतरावर साध्या पद्धतीचे पालापासून तयार केलेल्या छप्पर आहे. यामध्ये गेले 25 वर्षापासून हे पती-पत्नी राहत होते. ते आपला उदरनिर्वाहासाठी शेळीपालन करत होते दिवसभर धरण परिसरात बकऱ्या शेळ्या चारायवयाच्या व रात्री या छपरामध्ये बांधून त्यांच्यासोबतच हे पती-पत्नी राहत होते. या छपरापासून काही अंतरावरच त्यांचा मुलगा राहत होता.. नेहमीप्रमाणे हे दाम्पत्य आपल्या शेडमध्ये होते. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास या दांपत्यावर हल्ला झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली… या घटनेनंतर गावामध्ये खळबळ माजली असून या दांपत्या वर हल्ला झाला की घातपात झाला याची चर्चा सुरू आहे

 

अखेर त्यांच्या हल्ल्यात बळी पडले की काय ?

 

गेले पंचवीस वर्षे पती-पत्नी बकरी पालन करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. दिवसभर धरण परिसरात बकरी चारायला घेऊन जायचं व रात्रभर आपल्या छपरात त्या बकऱ्यांना बांधून जंगली जनावरापासून त्यांचं संरक्षण करायसाठी त्यांच्या सोबतच राहायचं. सोबतीला चार कुत्री असायची मात्र शुक्रवार रात्री त्यांच्यावर जणू काळरात्रच उलटली आणि डोळ्यात तेल घालून आपल्या बकऱ्यांचे रक्षण करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. यामुळे ज्यांच्यापासून बकरयांचा जीव वाचवण्यासाठी डोळ्यात तेल घालून जागरण करून दिवस काढले. त्यांच्या सोबत नियतीन खेळ खेळत एका वेगळ्या दिशेने त्यांना मृत्यूच्या खाईत लोटलं. यामुळे त्यांच्या या हल्ल्याची सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती.

 

कष्टात जगले आणि कष्टातच अंत झाला

 

कंक पती पत्नी हे अतिशय गरीब होते. शेतीत कष्ट करून ते आपला उदरनिर्वाह करायचे. गावापासून काही अंतरावर असलेल्या शेडमध्ये ते वास्तव्य करत होते. आणि त्या ठिकाणी शेळी पालन करून ते आपला चरितार्थ चालवत होते. मात्र शुक्रवारी रात्री त्यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यांची छिन्ह विच्छिन्ह अवस्थेत झालेली मृत्यूची झुंज यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अखेरपर्यंत या पती-पत्नीने कष्ट करून आपलं जीवन जगलं. आणि अखेर त्यांचा शेवट देखील कष्टातच झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती

 

तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही

 

कष्टकरी शेतकरी दांपत्यावर वाघसदृश्य प्राण्याकडून हल्ला केला आहे. यामध्ये त्यांचा जीव गमवावा लागला. अशा स्थितीत वन विभाग गांभीर्याने घेत नाही. तालुक्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. यासाठी वन विभागाने या प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. आज एक कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. त्यांची जबाबदारी कोण घेणार. जोपर्यंत वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येत नाहीत आणि याबद्दल आपली ठोसभूमिका जाहीर करणार नाहीत. तोपर्यंत मृतदेह ताब्यात येणार नाही अशी भूमिका यावेळी घटनास्थळी नागरिकांनी घेतली होती,

 

उसे तज्ञांना पाचारण

 

दरम्यान घटनेचं गांभीर्य ओळखून ठसे तज्ञांना देखीत या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. यामुळे या परिसरात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. पती-पत्नीचा मृत्यू नेमका कशाने झाला मावावत तर्क वितर्क काढले जात होते वाशिवाय पटनेची माहिती मिळताच पौत्तीस उपाधीक्षक आप्पासाहेब पंधार पोलीस निरीक्षक विजय पेरडे, वनपरिक्षेत्र अधिकारी उज्जता मगदूम बांच्यासह वन विभागाचे अनेक अधिकारी, कर्मधारी वा लिकाणी उपस्थित होते.

 

दरम्यान घटनास्थळी माजी आमदार सत्यजित पाटील, माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, शेतकरी जनआक्रोश समितीचे अध्यक्ष आबासाहेब पाटील आदींनी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली व याबाबत योग्य ते कारवाई होण्याबाबत संबंधितांशी चर्चा केली. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -