Sunday, October 26, 2025
Homeमहाराष्ट्रसातारा महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर

सातारा महिला डॉक्टर प्रकरण, पोलिसांची पत्रकार परिषद, आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती समोर

साताऱ्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिल्ह्यातील एका रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी या महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर एक सात ओळींची सुसाईड नोट लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तीने पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

या डॉक्टरने गुरुवारी रात्री एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, दरम्यान तिने आपल्या तळहातावर जी सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये असा आरोप केला आहे की, ‘पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आहे, तर दुसरा अधिकारी प्रशांत बनकर याच्याकडून मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू आहे, असं या महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

 

दरम्यान आता या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे, या प्रकरणात नुकतीच पोलिसांची पत्रकार परिषद पार पडली, या महिला डॉक्टरानं गुरुवारी एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहिली होती, त्यामध्ये पोलीस अधिकारी असलेल्या गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, गोपाल बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचं या महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. त्यानंतर गोपाल बदने याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली असून, त्याचं निलंबन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे, आरोपींचा शोध सुरू असल्याचं देखील पोलिसांनी म्हटलं आहे.

 

नेमकं काय आहे प्रकरण?

 

साताऱ्यामधील एक महिला डॉक्टराने आपलं आयुष्य संपवलं आहे, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. ज्यामध्ये तिने पीएसआय गोपाल बदने याच्यावर गंभीर आरोप केले आहेत, गोपाल बदने याने आपल्यावर अत्याचार केल्याचं या डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे, त्यानंतर आता त्याचं निलंबन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -