योगी सरकारच्या धोरणांना उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांकडून भरभरून पाठिंबा मिळत आहे. धान विक्रीसाठी शेतकरी नोंदणी सुरू झाली आहे. 2025-26 या वर्षाच्या खरेदी सत्रासाठी ही नोंदणी 1 सप्टेंबर रोजी सुरु झाली आहे. 23 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत 1 लाख 37 हजार 166 शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. योगी सरकारने त्यासाठी 4,000 खरेदी केंद्र उघडण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले होते. त्यापैकी 3,790 खरेदी केंद्र अगोदरच सुरू झाली आहे. ही केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. धान खरेदी ही किमान आधारभूत किंमतीवर (MSP) करण्यात येत आहे.
1.37 लाख शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने धान खरेदीसाठी वेगाने नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले. 23 सप्टेंबर 2025 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1.37 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शेतकरी fcs.up.gov.in आणि उत्तर प्रदेश किसान मित्र मोबाईल अॅपद्वारे ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करत आहेत. धान खरेदीसाठी ओटीपी आधारीत एकल नोंदणी प्रणाली लागू करण्यात आली आहे. शेतकरी त्यांच्या मोबाईलवरील SMS द्वारे प्राप्त ओटीपी नोंदवून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले जातील.
23 दिवसांत 35.63 हजार मेट्रिक टन धान्याची खरेदी
पश्चिम उत्तर प्रदेशमधील मेरठ, सहारनपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा, अलिगढ आणि झांसी या विभागात 1 ऑक्टोबरपासून धान खरेदीचा श्रीगणेशा जाला. याशिवाय लखनऊ विभागातील हरदोई, लखीमपूर खेरी आणि सीतापूर जिल्ह्यातही धान खरेदीला वेग आला आहे. योगी सरकारने 60 लाख मेट्रिक टन धान खरेदीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. 23 दिवसांत या विभागांमध्ये 35.63 हजार मेट्रिक टन धान्याची खरेदी झाली आहे. ही प्रक्रिया सुरू आहे.
डबल इंजिन सरकारने यंदा धानासाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे. त्यासाठी हा भाव सध्या 2,369 रुपये प्रति क्विंटल आणि ग्रेड-ए धानसाठी ही किंमत 2,389 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. योगी सरकारने धान खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 48 तासात खरेदी रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
धान खरेदी केंद्र सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू आहेत. 17 टक्क्यांपर्यंत आर्द्रता असलेले धान खरेदी करण्यात येत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत, सरकारने राज्यभरात 4,000 खरेदी केंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवले, त्यातील 3,790 केंद्र अगोदरच सुरू करण्यात आली आहेत. तर पूर्व उत्तर प्रदेशात 1 नोव्हेंबरपासून धान खरेदीला सुरुवात होईल. यामध्ये चित्रकूट, कानपूर, अयोध्या, गोरखपूर, देवीपाटण, बस्ती, आझमगड, वाराणसी, मिर्झापूर आणि प्रयागराज या विभागांचा समावेश आहे. लखनऊ, रायबरेली आणि उन्नाव मध्ये याच तारखेपासून हा प्रयोग सुरु होत आहे. 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत ही खरेदी सुरू असेल.







