Saturday, October 25, 2025
Homeयोजनानोकरीबँकेत नोकरीची सुवर्णसंधी: लेखी परीक्षेचा ताण नाही फक्त मुलाखत द्या नोकरी मिळवा;...

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी: लेखी परीक्षेचा ताण नाही फक्त मुलाखत द्या नोकरी मिळवा; जाणून घ्या सविस्तर माहिती

जर तुम्ही बँकिंग (Bank Hiring) आणि वित्त क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने (CBSL) एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. कंपनीने ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याची संधी मिळणार आहे

 

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. उमेदवारांची निवड केवळ मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

 

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज करता येईल. उमेदवारांना अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन, दोन्ही प्रकारे सादर करण्याची मुभा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेत पदवीधर असावा आणि पदवीमध्ये किमान 50 टक्के गुण आवश्यक आहेत. तसेच, अर्जदाराचे वय 31 ऑगस्ट 2025 पर्यंत किमान 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावे.

 

मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीची माहिती थेट त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर पाठवली जाईल. मात्र, मुलाखतीसाठी बोलावणे म्हणजे अंतिम निवड नाही. निवड झाल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी आणि पात्रता तपासणी करण्यात येणार आहे.

 

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22000 रुपयांचा निश्चित स्टायपेंड मिळेल. याशिवाय, कामगिरी चांगली असल्यास 2000 रुपयांपर्यंत अतिरिक्त प्रोत्साहनही दिले जाईल. म्हणजेच उमेदवाराला एकूण 24000 रुपयांपर्यंत मासिक मानधन मिळू शकते.

 

भरती प्रक्रियेत प्रथम प्राप्त अर्जांचे परीक्षण केले जाईल. त्यानंतर पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखत ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे घेण्यात येऊ शकते.

 

कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने जाहीर केलेली ही भरती बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी आहे. ट्रेनी (सेल्स अँड मार्केटिंग) या पदांसाठी ही भरती होत असून, उमेदवारांना प्रत्यक्ष बँकिंग क्षेत्रात अनुभव मिळण्याचीही संधी मिळेल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -