Friday, October 31, 2025
Homeयोजनाकाय सांगता. फक्त व्याजातूनच मिळतील २.४६ लाख रूपये. काय आहे पोस्ट ऑफिसची...

काय सांगता. फक्त व्याजातूनच मिळतील २.४६ लाख रूपये. काय आहे पोस्ट ऑफिसची ही मालामाल योजना

प्रत्येक जण त्यांच्या उत्पन्नातील काही भाग वाचवतो आणि सुरक्षित तसंच जास्त परताव्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधतो. त्यानुसार पोस्ट ऑफिसच्यादेखील काही भन्नाट योजना आहेत.

 

यामध्ये मुलांपासून तरूण, महिला आणि वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योजनांचा समावेश आहे. पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक भन्नाट योजना आहे. कारण त्यात गुंतवणूक केल्याने केवळ व्याजातूनच तुम्हाला दर महिन्याला २०,५०० रूपयांपर्यंतची कमाई होऊ शकते. शिवाय करलाभ देखील आहेच. तर या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ…

 

नियमित मासिक उत्पन्नाची हमी

 

पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक योजना ही सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत एकरकमी गुंतणवूक केल्यास २० हजारांपेक्षा जास्त मासिक उत्पन्नाची हमी देते. यामुळे निवृत्तीनंतर तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि नियमित मासिक उत्पन्न मिळेल.

 

उत्तम व्याजदर आणि कर सवलती

 

ही पोस्ट ऑफिस योजना सरकारकडून ठेवींवर उत्कृष्ट व्याजदर देते. गुंतवणूकदारांना वार्षिक ८.२ टक्के व्याजदर मिळतो. यामुळे तुमच्या गुंतवणुकीवर नियमित मासिक उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे अनेक बँकांद्वारे दिल्या जाणाऱ्या मुदत ठेवींपेक्षा ही योजना खूपच जास्त व्याजदर देते. शिवाय सरकार या योजनेअंतर्गत केलेल्या गुंतवणुकीवर ८० सी अंतर्गत १.५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्न कर सवलतीदेखील देते.

 

गुंतवणुकीसाठी वयोमर्यादा

 

या सरकारी योजनेत गुंतवणूक करून कोणत्याही आर्थिक समस्यांशिवाय आनंदाने वृद्धापकाळ घालवता येईल. ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती एकल किंवा संयुक्त खाते उघडू शकते. याशिवाय नागरी क्षेत्रातील सरकारी पदांवरून व्हीआरएस घेतलेले ५५ ते ६० वर्षे वयोगटातील लोक किंवा संरक्षण क्षेत्रातील ५० ते ६० वर्षे वयोगटातील लोक खाते उघडू शकतात.

 

घरबसल्या कमवा २.४६ लाख रूपये

 

समजा तुम्ही एकरकमी ३० लाख रूपये गुंतवले. नियमित व्याजदर ८.२ टक्के प्रमाणे या गुंतवणुकीवर वार्षिक २.४६ लाख रूपये व्याज मिळेल. ही रक्कम दरमहा विभागली तर तुम्ही २०,५०० रूपये हमी मासिक उत्पन्न मिळवू शकता. या योजनेचा परिपक्वता कालावधी ५ वर्षे आहे.

 

खाते बंद करण्याची सुविधा

 

पोस्ट ऑफिस SCSS योजनेअंतर्गत खाते जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिस शाखेत जाऊन उघडता येते. गुंतवणूकदारांना खाते उघडल्यानंतर कधीही बंद करण्याचा पर्यायदेखील दिला जातो. असं असताना यासाठी काही नियम आहेत. यामध्ये जर खाते उघडल्यापासून एक वर्षापेक्षा कमी कालावधीत बंद केले तर गुंतवणूक रकमेवर कोणतेही व्याज मिळणार नाही. जर तुम्ही ते १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर किंवा २ वर्षांच्या दरम्यान बंद केले तर व्याजाच्या रकमेतून १.५ टक्के वजा केले जाईल. त्याचप्रमाणे जर तुम्ही ते २ ते ५ वर्षांच्या दरम्यान बंद केले तर व्याजाच्या रकमेच्या १ टक्के वजा केले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -