Friday, October 31, 2025
Homeक्रीडाश्रेयस अय्यर ICU मध्ये, अंतर्गत रक्तस्त्राव, डॉक्टर काय बोलले?

श्रेयस अय्यर ICU मध्ये, अंतर्गत रक्तस्त्राव, डॉक्टर काय बोलले?

भारताच्या वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याला ICU मध्ये ठेवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरला अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. रिपोर्ट्नुसार, खबरदारी म्हणून श्रेयसला रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात ठेवलं आहे. त्याला पाच ते सात दिवस रुग्णालयातच रहावं लागेल अशी शक्यता आहे.

 

श्रेयस अय्यरच्या बरगड्यांना मार लागला आहे. सिडनी येथे वनडे सीरीजच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन इनिंगच्या 34 व्या ओव्हरमध्ये श्रेयसला ही दुखापत झाली. हर्षित राणाच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरीचा कॅच पकडताना श्रेयसला मार लागला. बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या श्रेयस अय्यरने मागे पळत जाऊन कॅच पकडलेली. पण त्याला सुद्धा इंजरी झाली.

 

श्रेयस अय्यरची वाईट अवस्था होती

 

दुखापतीमुळे श्रेयस अय्यरची वाईट अवस्था होती. मैदानावरच तो पोट आणि छातीचा भाग पकडून वेदनेने विव्हळताना दिसलेला. त्यानंतर मेडिकल टीम त्याला मैदानाबाहेर घेऊन गेली. आता त्याच्या इंजरीची गंभीरता लक्षात घेऊन सिडनीच्या रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं आहे.

 

श्रेयसला किती दिवस रुग्णालयात ठेवणार?

 

टीम इंडिया आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीज खेळणार आहे. श्रेयस अय्यर या टीमचा भाग नाहीय. मात्र, तरीही दुखपतीची गंभीरता लक्षात घेऊन उपचारासाठी मॅनेजमेंटने त्याला तिथे थांबवलय. रिपोर्ट्नुसार, श्रेयसला ICU मध्ये ठेवलय. अय्यरला जवळपास आठवडाभर इथे रहावं लागू शकतं.

 

श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार?

 

श्रेयस अय्यर मैदानावर कधी परतणार असा सवाल क्रिकेटप्रेमींकडून विचारला जातोय. श्रेयस अय्यर 30 नोव्हेंबर रोजी रांची येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -