Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रकारची रिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू, सात जखमी

कारची रिक्षाला धडक; महिलेचा मृत्यू, सात जखमी

गडहिंग्लज ते संकेश्वर जाणार्‍या रस्त्यावर शहरानजीकच सुसाट आलेल्या कारने प्रवासी वाहतूक करणार्‍या रिक्षाला मागून जोराची धडक दिल्याने एक ठार, तर सात जण जखमी झाले. शोभा दुडाप्पा जरळी (वय 58, रा.निलजी, ता. गडहिंग्लज) असे मृत भाजी विक्रेत्या महिलेचे नाव आहे. वॅगनआरमधील सुप्रिया विलास बागी, पवित्रा संभाजी कांबळे, शुभांगी कांबळे (रा. तनवडी) हे तिघे जखमी झाले तर रिक्षमधील अजित मोतीलाल मरांडे, रामशंकर म्हातोर, चंद्रशेखर म्हातोर (रा.झारखंड) हे कामगार जखमी झाले.

 

संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यानंतर या मार्गावरून सध्या वाहनांचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे या मार्गावर सध्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे आजचा अपघातही अशाच प्रकारे झाला. या अपघातात जखमी झालेल्या शोभा या भाजीविक्रेत्या शेतकरी असून त्या भाजी विक्री करण्यासाठी प्रवासी रिक्षातून भाजी विक्रीसाठी येत असताना झालेल्या अपघातात त्यांना जीव गमवावा लागला. त्यांच्या पश्चात पती,मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अल्पभूधारक असलेल्या शोभा ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या. भाजी विक्रीतुन त्या घर चालवत होत्या. त्यांच्या अपघाती निधनाने जरळी कुटुंबावर मोठे संकट ओढवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -