Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रडॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची मोठी मागणी, थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची मोठी मागणी, थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर भाजपा नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतंच त्या पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर आता याप्रकरणी पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. यावेळी पंकजा मुंडे या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत.

 

साताऱ्यातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्यापूर्वी तिने आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहिली होती. यात तिने पीएसआय गोपाळ बदने आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी थेट पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांवरच आरोप झाल्याने सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर याला अटक केली आहे. तर पीएसआय गोपाळ बदने हा स्वत: पोलिसांनी शरण आला. यानंतर त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे.

 

पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट

या प्रकरणाच्या अनुषंगाने पंकजा मुंडे यांनी डॉक्टर तरुणीच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील मूळ गावी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी आई-वडिलांचे सांत्वन केले. त्यांना धीर दिला. डॉक्टर तरुणीचा मृत्यू अतिशय वेदनादायी आहे. मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. तिला न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी कुटुंबाला दिलासा दिला.

 

लवकरात लवकर चौकशी करा

यावेळी पंकजा मुंडे यांनी साताराचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना फोन करून मृत्यू प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या प्रकरणाची निःपक्ष आणि लवकरात लवकर चौकशी करुन डॉ. संपदा आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्व स्तरांतून जोर धरु लागली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -