Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रहाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा...

हाय टेंशन तारेला स्पर्श होताच बसला भीषण आग; 12 कामगार होरपळले, दोघांचा मृत्यू

राजस्थानच्या जयपूरमध्ये बस अपघाताची (Accident) धक्कादायक घटना घडली असून बसमधील 2 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जयपूर येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला अचानक आग लागल्याने बसमधील (Bus) 12 प्रवासी आगीच्या झोक्यात आले होते. त्यापैकी, 2 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. जयपूर शहरापासून 65 किमी दूर मनोहरपूर परिसरात ही दुर्घटना घडली. त्यामध्ये, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

 

बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. बसने पेट घेतल्यानंतर बसमध्ये असलेल्या 5 ते 6 गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे, बस पूर्णपणे जळून खाक झाली असून बसमधील प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. जखमींना नजदीकच्या खासगी व सरकारी, विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांकडून शोक

दरम्यान, बस अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला. जयपूरच्या मनोहरपूर येथील बस अपघाताची दुर्घटना अत्यंत शोकदायक आहे. या दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच, अपघातातील जखमींच्या उपचारासाठी संबंधित प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. जखमींच्या लवकरच बरे होण्यासाठी प्रार्थना करतो, असे ट्विट मुख्यमंत्री शर्मा यांनी केलं आहे.

 

सातत्याने घडणारे अपघात चिंताजनक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अशोक गेहलोत यांनी अपघाताच्या घटनेवर दु:ख व्यक्त केले. तसेच, सातत्याने घडणाऱ्या अपघातांच्या घटनेवरुन सरकारलाही लक्ष्य केलं आहे. राजस्थानमध्ये सातत्याने घडणाऱ्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत. दुर्घटनेतील मृतांप्रती श्रद्धांजली अर्पण करुन, नातवाईकांप्रती सहवेदना असल्याचे अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -