ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयटीआय परिसरातील कोल्हापुरातील पहिल्या ओमायक्रॉन बाधिताचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो ठणठणीत बरा आहे, असे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील सर्वांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
संबंधित व्यक्तीच्या पत्नीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने 14 डिसेंबरला प्राप्त झाला होता. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर कुटुंबातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
यानंतर बुधवारी या कुटुंबातील एका व्यक्तीला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले. जिल्ह्यात पहिला ओमायक्रॉन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. त्याच्या बंगल्यासमोरील परिसर सील करण्यात आला.
कोल्हापुरातील ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण ठणठणीत
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -