Thursday, October 30, 2025
Homeयोजनानोकरीकोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी! लवकरच करा अर्ज... काय आहे पात्रता?

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळवा रेल्वेत नोकरी! लवकरच करा अर्ज… काय आहे पात्रता?

सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ (IRCTC) कडून ‘हॉस्पिटॅलिटी मॉनिटर’च्या एकूण 64 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

 

 

विशेष बाब म्हणजे, कोणत्याही लेखी परीक्षेशिवाय या पदांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. केवळ वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या आधारे, उमेदवारांची या पदांसाठी निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार irctc.com या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

 

हॉस्पिटॅलिटी किंवा हॉटेल मॅनेजमेंट संबंधित कोर्स पूर्ण केलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र ठरतात. जसे की, बी.एससी इन हॉस्पिटॅलिटी अॅण्ड हॉटेल अॅडमिनिस्ट्रेशन, बी.एससी इन हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग सायन्स, एमबीए इन टुरिझम अँड हॉटेल मॅनेजमेंट किंवा बीबीए तसेच एमबीए इन कलिनरी आर्ट्स अशा क्षेत्रात शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. यासोबतच, या क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे.

 

वयोमर्यादा

 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी जनरल (Open) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 28 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तसेच, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 31 वर्षे, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 33 वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी 38 वर्षे कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 1 ऑक्टोबर 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल.

 

भरतीसाठी अर्ज केल्यानंतर उमेदवारांना वॉक-इन-इंटरव्ह्यूमध्ये सहभागी व्हावं लागेल. मुलाखतीदरम्यान, उमेदवारांच्या डॉक्यूमेंट्ची तपासणी केली जाईल आणि शेवटी मेडिकल टेस्ट घेण्यात येईल. या टप्प्यांनंतर, उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या भरतीमध्ये कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा आयोजित केली जाणार नाही.

 

किती मिळेल वेतन?

 

संबंधित पदांवर नियुक्ती झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 30 हजार रुपये वेतन दिलं जाईल. याव्यतिरिक्त, त्यांना IRCTC कडून इतर भत्ते सुद्धा मिळतील. मुलाखतीच्या दिवशी उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र, ओळखपत्र, पासपोर्ट साइझ फोटो आणि संबंधित क्षेत्रात अनुभव प्रमाणपत्र अशी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहे.

 

कसा कराल अर्ज?

 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम irctc.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरतीच्या संबंधित लिंकवर क्लिक करा. त्यानंतर सर्व आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शेवटी, सर्व आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी त्याची प्रिंटआउट काढून ती सुरक्षितरित्या ठेवा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -