Thursday, October 30, 2025
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त 'या' शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 21वा हप्ता, केंद्र सरकारकडून...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! फक्त ‘या’ शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 21वा हप्ता, केंद्र सरकारकडून नवीन नियम जाहीर

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने राज्यांना लाभार्थ्यांची पडताळणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने सर्व राज्यांना आवश्यक सूचना दिल्या असून, पात्र लाभार्थ्यांना वेळेत पैसे मिळावेत यासाठी तयारी जोमात सुरू आहे.

 

फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम प्रत्येकी ₹2,000 च्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) द्वारे जमा केली जाते. सध्या 10 कोटींहून अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

 

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, 21वा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. पूर्वी दिवाळीपूर्वी पैसे येतील अशी अपेक्षा होती, परंतु आता बिहार निवडणुकीपूर्वी (6 नोव्हेंबरपासून सुरू) रक्कम वितरित होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही.

 

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, “पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ₹2,000 जमा केले जातील. सर्व राज्यांनी ई-केवायसी, आधार लिंकिंग आणि जमीन नोंदींची पडताळणी तातडीने पूर्ण करावी.” त्यांनी सांगितले की, ज्या शेतकऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत, त्यांनाही लाभ मिळण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.

 

काही राज्यांमध्ये आधीच हप्ता वितरित झाला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील शेतकऱ्यांना रक्कम देण्यात आली. 7 ऑक्टोबर 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील 8.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹171 कोटी जमा झाले. उर्वरित राज्यांना निधी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी अपेक्षा आहे.

 

पुढील कारणांमुळे काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.

 

ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण

 

आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसणे

 

बँक खात्याचे तपशील चुकीचे किंवा अपूर्ण असणे

 

राज्य सरकारांना पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून यादी केंद्राकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

बिहारमध्ये सध्या आचारसंहिता लागू आहे, मात्र सुरू असलेल्या योजनांचे हप्ते देण्यावर बंदी नाही. त्यामुळे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यास, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात ₹2,000 जमा होण्याची शक्यता आहे.

 

जर तुमचं ई-केवायसी, आधार लिंकिंग, किंवा बँक खाते तपशील अद्ययावत नसतील, तर तात्काळ पूर्ण करा. अन्यथा तुमचा 21वा हप्ता अडकू शकतो. केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातच रक्कम जमा होईल.

 

PM Kisan योजनेचा पुढील हप्ता काही दिवसांतच येणार आहे. सरकारकडून सर्व तयारी पूर्ण असून, वेळेवर निधी मिळावा यासाठी राज्य प्रशासन सतर्क आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रं लगेच तपासा आणि लाभ मिळवण्यासाठी सज्ज राहा!

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -