सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. सेबीमध्ये सध्या असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी अधिसूचनादेखील जाहीर करण्यात आली आहे.
सेबीमध्ये असिस्टंट मॅनेजर होण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
सेबीमधील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया काल म्हणजेच ३० ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज करायचे आहेत. या नोकरीसाठी तुम्ही www.sebi.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात.
सेबीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. वित्त, अर्थशास्त्र, मॅनेजमेंट, आयटी किंवा कायदा या विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
असिस्टंट मॅनेजर पदासाठी इच्छुक उमेदवाराचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
सेबीमधील या नोकरीसाठी निवड स्टेज १ परीक्षा, स्टेज २ परीक्षा आणि इंटर्व्ह्यूद्वारे होणार आहे. या दोन्ही परीक्षांमध्ये पास होणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलवले जाईल. यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.स्टेज १ परीक्षा १० जानेवारी २०२६ तर स्टेज २ परीक्षा २१ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाईल.
पगार
या नोकरीसाठी अर्ज करताना सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरायचे आहे तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना बेसिक सॅलरी ३५,४०० रुपये मिळेल. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. १ लाखांपर्यंत पैसे दिले जातील.

