छटपुजेसाठी आल्यानंतर पंचगंगा नदीत बुडालेल्या विनीत किरोद चीधरी (वय २२, रा. योगायोगनगर, पुजारी महा) पा युवकाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी मिळून आला. महानगरपालिका आपत्कालीन पथक, अग्निशमन दान आणि स्थानिक नागरीक तीन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते.
पंचगंगा नदी घाटाका छटपुजेसाठी मंगळवारी पहाटे विनीत चौधरी हा आपल्या आई-वडीलांसोबत गेला होता, पुजेनंतर तो घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता तो मित्रांसमवेत पोहताना नदीत बुडाल्याचे स्पष्ट झाले. वाचावत माहिती मिळताच महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख संजय कांबळे बांनी सहकान्यासह अधिशमन दल आणि स्थानिक नागरिक विनीतचा शोध घेत होते. नदीच्या खोल भागातील पाण्याचा प्रवाह आणि विखलामुळे शोधमोहीमेत अडचणी येत होत्या. त्यातूनही गेले तीन दिवस ही मोहिम सुरु होती. अखेर तब्बल ५६ तासांनी गुरुवारी दुपारी मोठ्या पुलापासून एक किलोमीटर अंतरावर काळा ओदा परिसरातील शिरदवाड दर्याजवळ विनीत याचा मृतदेह लाकडी पाटाला अडकलेला आदळून आला. आपत्कालीन पथकाने मृतदेह बाहेर काढुन तातडीने गावभाग पोलीस तसेच विनीतच्या नातेवाईकांना माहिती दिली. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
