Monday, November 3, 2025
Homeब्रेकिंगसोन्यात गुंतवणुकीचे सर्वात भारी 2 पर्याय, गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्यूअल फंड...

सोन्यात गुंतवणुकीचे सर्वात भारी 2 पर्याय, गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्यूअल फंड म्हणजे नेमकं काय?

सध्या सोन्याच्या भावामध्ये घसरण झाली आहे. सोन्याचा भाव कमी झालेला पाहून आता अनेक गुंतवणूकदार या महागड्या धातूमध्ये पैसे गुंतवत आहेत. भारतात सोन्यातील गुंतवणूक ही फक्त पैसे कमवण्यासाठीच केली जात नाही. सोने हा भारतात भावणिक विषय आहे. सध्या लोक सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्यूअल फंड या दोन पर्यायांची चांगलीच चर्चा होत आहे. हे दोन्ही पर्याय नेमके काय आहेत? हे जाणून घेऊ या…

 

गोल्ड ईटीएफ म्हणजे नेमकं काय?

गोल्ड ETF (Exchange Traded Fund) मध्ये प्रत्येक युनीटमध्ये 1 ग्रॅम सोने असते. या सोन्याची शुद्धता ही 99.5 टक्के असते. विशेष म्हणजे हे सोने शेअर बाजारातून खरेदी तसेच विकता येते. त्यामुळेच गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे डीमॅट खाते असणे गरजेचे आहे. ईटीएफचा दर हा शेअर्सप्रमाणेच दिवसभरात बदलत राहतो. सोन्याचा भाव पाच टक्क्यांनी वाढला तर गोल्ड ईटीएफची किंमतही तेवढीच वाढते. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली तर सोन्याची चोरी होण्याची शक्यता नसते. तसेच सोन्याच्या शुद्धतेबाबतही कोणतीही शंका निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तुम्ही गरजेनुसार गोल्ड ईटीएफद्वारे घेतलेले सोने विकूदेखील शकता.

 

गोल्ड म्युच्यूअल फंड म्हणजे काय?

ज्या लोकांकडे डीमॅट खाते नाही. त्यांच्यासाठी गोल्ड म्युच्यूअल फंड हा चांगला पर्याय आहे. या फंडाच्या माध्यमातून फंड व्यवस्थापक तुम्ही दिलेल्या पैशांची गुंतवणूक थेट सोने किंवा गोल्ड ईटीएफमध्ये करतात. एसायपीच्या माध्यमातून तुम्हाला गोल्ड म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करता येते. RiddiSiddhi Bullions Ltd. चे एमडी पृथ्वीराज कोठारी यांच्या मतानुसार नव्या गुंतवणूकदारांसाठी गोल्ड म्युच्यूअल फंड सोईचा आहे. तर रियल टाईम ट्रेडिंग आणि लिक्विडिटीसाठी ईटीएफ चांगला पर्याय ठेवू शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -