Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अतुल संपतराव जाधव-पाटील (वय 30, रा. मनपाडळे, ता. हातकणंगले) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश (1) श्रीमती आर. व्ही.

आदोने यांनी दोषी ठरविले. आरोपीला 12 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

 

ऑगस्ट 2015 पूर्वी वेळोवेळी हा प्रकार घडला होता. खटल्याची पार्श्वभूमी अशी ः पीडित मुलीच्या आईचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांकडे तिचे वास्तव्य होते. मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडिता 7 महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर अत्याचाराचा प्रकार उघड झाला.

 

याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात अतुल जाधव-पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोप दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश (1) श्रीमती आदोने यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षामार्फत सहायक सरकारी वकील अमृता ए.पाटोळे यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकिलांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

 

भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 376 (2) (आय) (जे) (एन), 506 तसेच पोक्सो कलम 6 नुसार 12 वर्षे सक्तमजुरी, 15 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास 7 महिने 15 दिवस कैद तसेच दंडाच्या रकमेपैकी 7 हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश झाला आहे. खटल्याच्या निकालाकडे हातकणंगले, शिरोळ तालुक्याचे लक्ष लागले होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -