हिवाळ्याची चाहूल लागत असतानाच भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिलाय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होईल.
7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या भागात हलक्या ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल. महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून सतत पाऊस बघायला मिळतो. मोंथा चक्रीवादळादरम्यानही वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. पुढील 5 ते 6 दिवसांत वायव्य भारतात किमान तापमानात कोणताही लक्षणीय बदल होणार नाही, पूर्व उत्तर प्रदेश वगळता. राज्यात सतत वातावरणात बदल होताना दिसत आहेत. पुढील तीन ते चार दिवस राज्यावर पावसाचे ढग कायम असणार आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. ईशान्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्यात पावसाच्या हाहाकाराने मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. मात्र, पाऊस काही थांबण्याचे नाव अजिबात घेत नाही. पाऊस अन ढगाळ वातावरणामुळे उष्णतेची चटके कमी झाल्याचे दिसतंय.
ऑक्टोबर महिना ऑक्टोबर हिट अर्थात वाढत्या उष्णतेसाठी ओळखला जातो. साधारणपणे या काळात तापमान झपाट्याने वाढवण्याचे चटके जाणवतात. मात्र, यंदाच्या आक्टोबर नेहमीच्या ऑक्टोबर हिट पासून पूर्णपणे वेगळा आहे. यंदा हवामानाने अपेक्षित कलाटणी घेतली उष्णतेचे शहरांमध्ये मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वारासह पावसाने हजेरी लावली.परिणामी नेहमीप्रमाणे ऑक्टोबरमध्ये जाणवणारे उष्णतेचे चटके यांचा जवळपास गायब झाले होते.
यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. नोव्हेंबर महिन्यात देखील तिच स्थिती कायम आहे. पुण्यात थंडीला सुरुवात झाल्याचे बघायला मिळतंय. पुढील पाच दिवसात पारा आणखी खाली येणार असल्याचे सांगितले जातंय. शहरात संपूर्ण ऑक्टोबरमध्ये ढगाळ वातावरण आणि अधून मधून पावसाची स्थिती होती. नंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही पावसाची हजेरी लावली. मात्र आता पावसाने संपूर्ण विश्रांती घेतली असून किमान तापमानात घट नोंदवण्यात आलीय. दरम्यान पुढील पाच ते सहा दिवसात कमाल आणि किमान तापमानांमध्ये दोन ते तीन अंश सेल्सिअस घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहे.



