दिल्ली कार बॉम्बस्फोट प्रकरणात तपास सुरू असून धक्कादायक माहिती पुढे येताना दिसतंय. थेट पुलवामा कनेक्शन पुढे आल्याने हा घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही कार एकाकडून दुसऱ्याकडे आणि दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे गेल्याचे तपासात पुढे आले. या स्फोटामध्ये फरीदाबाद येथील डॉक्टर उमर नबीच नाव समोर आले. हेच नाही तर स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही पुढे आले असून गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने तोंडावर काळे मास्क लावल्याचे दिसत आहे. या स्फोटामध्ये 9 जणांचा जीव गेला तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. अमित शहा यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. गर्दीच्या ठिकाणीच हा स्फोट झाल्याने खळबळ उडाली.
आता या स्फोटाबद्दल खळबळ उडवणारी माहिती पुढे येताना दिसतंय. मोठा रचण्यात आला होता. मात्र, घाईमध्ये हा दिल्लीचा स्फोट घडल्याची माहिती पुढे येतंय. दिल्लीच्या स्फोटापेक्षा कितीतरी पट मोठा कट करण्याचा प्रयत्न होता. उमर हा जैशचा VBIED एक्सपर्ट होता. मात्र, घाईमध्ये हा स्फोट झाल्याने छोटा झाल्याची माहिती आहे. हेच नाही तर संपूर्ण गाडीमध्ये स्फोटके होती, अशीही माहिती येतंय
मोठ्या घातपाताची योजना असल्याची माहिती आहे. फक्त हेच नाही तर ही गाडी तीन तासांपासून लाल किल्ल्याच्या आसपास फिरत होती. अवघ्या 4 मिनिटात हा स्फोट झाला. दिल्लीमध्ये इतकी कडक सुरक्षा असताना ही गाडी लाल किल्ल्याच्या आसपास कशी पोहोचली, यावर चर्चा सुरू आहे. मोहम्मद उमर हा गाडी चालवत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्याने तोंडाला काळ्या रंगाचा मास्क लावला आहे.
या स्फोटाची जबाबदारी असूनही कोणी स्वीकारली नाही. मात्र, तपास यंत्रणांकडून कसून चाैकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 13 लोकांना चाैकशीसाठी बोलावले आहे. त्यांच्याकडून कसून चाैकशी देखील सुरू आहे. मात्र, मोठा घातपात करण्याची योजना होती, असे दिसतंय. ऐन वर्दळीच्या ठिकाणी हा स्फोट झाला. देशातील इतरही शहरांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून अलर्ट जारी करण्यात आला आहे.


