Monday, November 24, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार

मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा ब्रेकअप, आता आयपीएलमध्ये या टीमकडून खेळणार

आयपीएल 2026 आधी चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये एक मोठी डील झाली आहे. सीएसकेने आपला स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा रॉजस्थान रॉयल्सला दिला आहे. आता 14 कोटी घेऊन जाडेजा पुढच्या सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसेल. राजस्थानने त्यांचा कॅप्टन संजू सॅमसनला सीएसकेकडे सोपवलं आहे. संज सॅमसन 18 कोटी घेऊन पुढच्या सीजनपासून CSK कडून खेळताना दिसेल. दोन्ही टीम्समध्ये या डीलसाठी बऱ्याच दिवसांपासून बोलणी सुरु होती.

 

आयपीएल 2026 सीजनसाठी सर्व फ्रेंचायजींकडे खेळाडू रिटेन करण्याची आजची शेवटची तारीख होती. या ट्रेड विंडोमध्ये रवींद्र जाडेजा, संजू सॅमसन, सॅम करन, मोहम्मद शमी, मयंक मार्कंडेय, अर्जुन तेंडुलकर, नीतीश राणा आणि देनोवन फरेरा या खेळाडूंचा समावेश होता. कुठल्या प्लेयरने कुठल्या टीमची निवड केलीय ते जाणून घेऊया.

 

सीनियर ऑलराऊंडर आणि माजी CSK चा कॅप्टन रवींद्र जडेजा आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळताना दिसणार आहे.

 

12 सीजनपर्यंत CSK कडून खेळणाऱ्या रवींद्र जाडेजाचं लीग शुल्क ₹18 कोटीने कमी होऊन ₹14 कोटी झालं आहे.

 

त्याच्या येण्याने RR ला एक ऑलराऊंडर मिळणार आहे.

 

संजू सॅमसन

 

RR चा कॅप्टन आणि भारताच विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन आता चेन्नई सुपरकिंग्ससाठी खेळणार आहे.

 

सॅमसनच जेवढं ₹18 कोटी शुल्क आहे, तेवढच त्याला CSK कडून मिळणार आहे.

 

सॅमसन सीएसकेमध्ये गेल्याने त्यांची ताकद वाढणार आहे.

 

सॅम करन

 

इंग्लिश ऑलराऊंडर सॅम करनला CSK ने RR मध्ये ट्रेड केल.

 

त्याची फी ₹2.4 कोटी ती तेवढील राहीलं.

 

सॅम करन आता आयपीएलमध्ये तिसऱ्या फ्रेंचायजीकडून खेळेल.

 

मोहम्मद शमी

 

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायजर्स हैदराबादने (SRH) लखनऊशी (LSG) ट्रेड केलय.

 

शमी ₹10 कोटी फी घेऊन LSG शी जोडला जाणार आहे.

 

119 आयपीएल मॅचचा अनुभव आणि 2023 मधील पर्पल कॅप विनर. शमी LSG साठी मोठ शस्त्र ठरु शकतो.

 

मयंक मार्कंडेय

 

लेग स्पिनर मयंक मार्कंडेय KKR मधून Mumbai Indians मध्ये परतला आहे,

 

30 लाख रुपये त्याची बेसिक फी आहे. त्याच रक्कमेवर तो मुंबई इंडियन्सकडून खेळेल.

 

अर्जुन तेंडुलकर

 

मुंबई इंडियन्सचा युवा ऑलराऊंडर अर्जुन तेंडुलकरला MI कडून LSG ने ट्रेड केलय.

 

त्याची सध्याची 30 लाख रुपये फी तेवढीच राहील. अर्जुन तेंडुलकर आता लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना दिसेल.

 

नितीश राणा

 

डावखुरा फलंदाज नितीश राणाला RR ने DC ला ट्रेड केलय.

 

त्याला सध्या राजस्थानकडून मिळणारी 4.2 कोटीची फी तेवढीच दिल्ली कॅपिटल्समध्ये मिळेल.

 

नितीश राणा 2023 मध्ये KKR चा कॅप्टन होता. तो 100 पेक्षा जास्त IPL सामने खेळलाय.

 

डोनोवन फरेरा

 

दक्षिण अफ्रिकेचा ऑलराउंडर फरेराला दिल्ली कॅपिटल्सने RR मध्ये ट्रेड केलय.

 

त्याची फी ₹75 लाखाने वाढवून ₹1 कोटी रुपये केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -