Monday, November 24, 2025
Homeराजकीय घडामोडीअजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात धक्का, राजीनामा सत्र सुरूच, थेट अध्यक्षपदाचा…

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात धक्का, राजीनामा सत्र सुरूच, थेट अध्यक्षपदाचा…

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली. 2 डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता मोठ्या घडामोडी राजकीय पक्षांमध्ये बघायला मिळत आहेत. आता बीड जिल्ह्यांत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अत्यंत मोठा धक्का बसला आहे. बीड जिल्ह्यांतील पुढील काळातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलल्याचे बघायला मिळेल.

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभा अध्यक्ष योगेश क्षीरसागर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला राम राम ठोकल्यानंतर योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. अजित दादांच्या राष्ट्रवादीची बीडमध्ये मोठी ताकद बघायला मिळते. मात्र, निवडणूक तोंडावर असतानाच राजीनामा सत्र सुरू आहे.

 

बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये क्षीरसागर आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांमध्ये दुमत निर्माण झाले. जागा वाटपावरून योगेश क्षीरसागरांनी स्वतंत्र आघाडी तयार करून नगरपरिषद निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. स्वतंत्र आघाडी ही भाजपसोबत युती करून लढणार असल्याची माहिती होती. मात्र, खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेला माहितीनुसार योगेश क्षीरसागर हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे‌.

 

दरम्यान योगेश क्षीरसागर यांनी आपल्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा काही वेळापूर्वीच राजीनामा दिला आहे. याबाबतची फेसबुक पोस्ट देखील त्यांनी केली आहे. राजीनाम्यामध्ये स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत सातत्याने डावलल्याने राजीनामा देत असल्याचे नमूद केले आहे. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक युवा नेता बीडमधून भाजपच्या गळाला लागल्याचं स्पष्ट होतंय. आता योगेश क्षीरसागर हे कधीपर्यंत भाजपमध्ये प्रवेश करतात किंवा पुढची त्यांची भूमिका कधी स्पष्ट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -