Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता

निवडणुकीआधी लाडक्या बहि‍णींना खुशखबर मिळणार, नोव्हेंबरचे ₹१५०० या दिवशी जमा होण्याची शक्यता

लडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ देऊन महिलांना दिलासा दिला आहे. दरम्यान, त्यानंतर आता अजून एक प्रश्न महिला विचारला जात आहे.लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे.

 

नोव्हेंबर महिना सुरु होऊन १८ दिवस झाले आहेत. अजूनपर्यंत नोव्हेंबरच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच हे पैसे जमा केले जातील. याचसोबत सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. यात आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचे सांगितले आहे.

 

निवडणुकीआधीच लाडक्या बहि‍णींना मिळणार पैसे

 

लाडकी बहीण योजनेत निवडणुकीआधीच महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका २ आणि ३ डिसेंबरला आहेत. त्याआधी महिलांना १५०० रुपये देण्याबाबत घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करावी. याचसोबत केवायसी करताना वेबसाइटवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी काही बदल केले आहेत. यामुळे महिलांना कोणत्याही अडचणीशिवाय केवायसी करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -