Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रआता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका...; महाराष्ट्र सरकारचा...

आता गुटखा विक्रेत्यांची खैर नाही! फक्त बंदी नाही, थेट मकोका…; महाराष्ट्र सरकारचा मोठा धडाका

महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) मंत्री नरहरी झिरवाल यांनी सांगितले आहे की, राज्य सरकार गुटख्याची उपलब्धता मर्यादित करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) लागू करण्याचा विचार करत आहे.

 

राज्यात गुटख्यावर आधीच बंदी आहे. यामुळे आता गुटखा विक्री करणाऱ्यांवर आळा बसणार आहे. याविरोधात आता कठोर पाऊले उचलण्यात येणार आहेत.

 

या प्रकरणी एफडीए मंत्र्यांनी मंगळवारी सांगितले की, गुटख्याच्या उत्पादन आणि विक्रीवर सध्या बंदी असूनही तंबाखूयुक्त उत्पादनाची बेकायदेशीर खेप बाहेरून राज्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांचे नुकसान होत आहे. मंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेल्या निवेदनात झिरवाल यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार गुटखा कंपन्यांचे मालक, प्रमुख संचालक आणि या बेकायदेशीर व्यापारामागील सूत्रधारांविरुद्ध मोक्का लागू करण्याचा विचार करत आहे.

 

ते म्हणाले की, महाराष्ट्रात गुटखा आणि पान मसाल्याच्या वाहतूक आणि विक्रीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मंगळवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, बेकायदेशीर गुटखा व्यापारासाठी जबाबदार असलेल्यांविरुद्ध मकोका अंतर्गत गुन्हे नोंदवता येतील का, याबाबत मार्गदर्शन मागणारा प्रस्ताव कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात येईल.

 

मंत्रालयात झालेल्या बैठकीत झिरवाल म्हणाले की, राज्य सरकार गुटखा बंदीची अधिक कडक अंमलबजावणी करेल आणि विविध विभागांमार्फत जिल्हा पातळीवर कर्करोग निर्माण करणाऱ्या उत्पादनाविरुद्ध जागरूकता मोहिमा राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -