Monday, November 24, 2025
Homeक्रीडादक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाला मिळणार नवा कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाला गेल्या काही महिन्यात दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंना आत बाहेर राहावं लागत आहे. असं असताना टीम इंडियाला दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोठा धक्का बसला. कर्णधार शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही याबाबत होता. पण आता तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नाही हे याबाबत संभ्रम आहे. शुबमन गिलबाबतचे अपडेट 21 नोव्हेंबरला दिले जाणार आहेत. त्यामुळे ऋषभ पंतकडे संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. आता ऋषभ पंतला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. कारण शुबमन गिल पूर्णपणे दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याचं वनडे मालिकेत खेळणं कठीण आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी शुबमन गिलकडे कर्णधारपद सोपवलं होतं. मात्र दुसऱ्याच मालिकेत दुखापतग्रस्त झाल्याने नव्या कर्णधाराची गरज भासरी आहे.

 

रेव्हस्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, शुबमन गिल अजूनही फिट नाही. जर त्याला गुवाहाटी कसोटीत खेळवण्यााचा निर्णय घेतला गेला असता आणि त्यात काही झालं असतं तर स्थिती अजून खराब झाली असती. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते मानेच्या दुखापतीतून सावरण्यासाठी पाच ते सात दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे शुबमन गिल खेळणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण खेळला नाही तर दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. कारण सलग सामने खेळत असल्याने दुखापतग्रस्त होत असल्याचं क्रीडातज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

वनडे मालिकेची धुरा आपसूक ऋषभ पंतकडे येण्याची शक्यता आहे. कारण ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत उपकर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे ऋषभ पंतच संघाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, केएल राहुल देखील वनडे कर्णधारपदाच्या शर्यतीत आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. गिल वनडे मालिकेपूर्वी बरा होईल की नाही? वनडे मालिका खेळणार का? असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -