Monday, November 24, 2025
Homeक्रीडाक्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील खेडेगावात, सेलिब्रिटींची उपस्थिती; पोलिसांचा बंदोबस्त, कसं असेल...

क्रिकेटर स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील खेडेगावात, सेलिब्रिटींची उपस्थिती; पोलिसांचा बंदोबस्त, कसं असेल नियोजन

विश्‍वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांच्या विवाहाची सध्या जोरदार धूम सुरू आहे.

 

हळदीचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. रविवारी (ता. २३) या दोघांचा विवाह सोहळा सांगलीतील समडोळी फाटा येथील फार्म हाऊस येथे होणार आहे. या सोहळ्यासाठी विश्‍वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंचे आगमन झाले आहे. शिवाय अनेक सेलिब्रिटीही या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

 

नुकत्याच भारतात झालेल्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकावले आहे. या संघाची स्मृती मानधना उपकर्णधार होती. तिचा विवाह निर्माता, संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी उद्या रविवारी निमंत्रितांच्या उपस्थितीत कौटुंबिक सोहळा होणार आहे. विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यानंतर पलाशने मैदानात जाऊन स्मृतीचे अभिनंदन केले होते. तसेच, तिला मैदानात जाऊन प्रपोजही केले होते.

 

स्मृती-पलाशच्या विवाहाची तयारी गेले काही दिवस सुरू आहे. समडोळी रोडवर असलेल्या फार्म हाऊसवर हा सोहळा रंगणार आहे.या विवाहासाठी भारतीय संघातील स्मृतीच्या सहकारी खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज, श्रेयांका पाटील, शेफाली वर्मा, रेणुका सिंह, रिचा घोष या चार दिवसांपूर्वीच दाखल झाल्या आहेत; तर नियोजित वर पलाश मुच्छलही दोन दिवसांपूर्वीच सांगलीत आला आहे. त्याचेही जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.

 

हळदीच्या निमित्ताने स्मृतीसह पलाश आणि भारतीय महिला संघातील खेळाडू नाचगाण्यात रंगून गेले होते. या क्षणाची छायाचित्रे, व्हिडिओ सोशल मीडियातही व्हायरल झाली आहेत. मेहंदी समारंभही उत्साहात पार पडला. संगीत संध्याचे आयोजन करण्यात आले होते. स्मृतीच्या फेसबुक वॉलवर या सोहळ्याची छायाचित्रे पाहायला मिळत आहेत.

 

शिवाय स्मृती आणि पलाश यांच्या संघांनी या ठिकाणी असलेल्या टर्फ मैदानात ‘प्री वेडिंग शादी प्रीमीयर लीग’ सामन्यात क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. उद्या होणाऱ्या विवाह सोहळ्यास सेलिब्रिटींची उपस्थिती राहणार असल्याने या विवाहासाठी पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून फक्त निमंत्रितांनाच विवाह स्थळी प्रवेश देण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -