Monday, November 24, 2025
Homeमहाराष्ट्रपंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या...

पंकजा मुंडेंच्या पीएच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल, अनंत गर्जे यांच्यासह कुटुंबातील या लोकांवरही गुन्हा

पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जच्या पत्नी, डॉक्डर गौरी पालवे-गर्जे यांनी मानसिक तणावात येऊन टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा दावा गौरी यांनी केला होता. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गौरी आणि अनंत यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. अखेर या सगळ्याला कंटाळून गौरीने काल स्वत:ला संपवले. आता या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

वडिलांच्या जबाबानंतर तक्रार दाखल

गौरीच्या आत्महत्येनंतर तिच्या वडिलांनी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरीला आत्महेत्येपूर्वी अनंत गर्जेच्या आधीच्या पत्नी किरणच्या गर्भवती असल्याची कागदपत्र मिळाल्याने ती अस्वस्थ होती. ती कागदपत्रे तिने आम्हाला पाठवली होती असा गौरीच्या वडिलांचा जबाब आहे. वडिलांच्या जबाबानंतर डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्येप्रकरणी पती, नणंद आणि दीरावर गुन्हा दाखल. गौरी गर्जेला मारहाण करून मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे देखील तक्रारीमध्ये सांगण्यात आले आहे.

 

तिघांवर गुन्हा दाखल

 

अनंत भगवान गर्जे, शीतल आंधळे, दीर अजय भगवान गर्जे हे माझ्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार आहेत. अनंत गर्जे हा गौरीने आत्महत्या केली असं सांगत असला तरी ही आत्महत्या आहे की घातपात आहे याची चौकशी व्हावी. वरील तीन लोकांविरोधात माझी तक्रार आहे, असे गौरीच्या वडिलांनी पोलिसांना स्टेटमेंट दिले आहे. त्यानंतर गौरीचा पती अनंत गर्जे, नणंद शीतल गर्जे आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरळी पोलीस ठाण्यात तिघांवर बीएनएस कलम १०८,८५, ३५२,३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल. गौरीला सासराच्या मंडळींकडून क्रुरतेची वागणूक देणे (८५) तसेच धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -