Friday, December 12, 2025
Homeमहाराष्ट्रEPFO लवकरच मोठा निर्णय घेणार.! पीएफ खात्यात ५२ हजार रुपये जमा होणार,...

EPFO लवकरच मोठा निर्णय घेणार.! पीएफ खात्यात ५२ हजार रुपये जमा होणार, कसा असेल नवा निर्णय?

ईपीएफओ लवकरच कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. देशातील संघटित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना EPFO लवकरच एक मोठी गुड न्यूज देणार आहे. संघटित क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांचे पीएफ अकाउंट असते आणि हे अकाउंट ईपीएफओ कडून संचालित केले जाते.

दरम्यान, ईपीएफओच्या सदस्यांसाठी अर्थातच पीएफ खातेधारकांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) वरील व्याजदरात वाढ करण्याचा विचार केला जात असून, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी व्याजदर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असा अंदाज सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

 

सध्या हा व्याजदर ८.२ टक्के आहे. जर ही वाढ लागू झाली, तर देशातील सुमारे ८ कोटी पीएफ खातेधारकांना याचा थेट फायदा होणार आहे. पीएफ खातेधारकांच्या मनात यावेळी सर्वात मोठा प्रश्न म्हणजे यंदा त्यांच्या खात्यात किती व्याज जमा होणार.

 

मार्केट तज्ज्ञ आणि सूत्रांच्या माहितीनुसार, सरकार जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकते. व्याजदर ८.७५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यास मंजुरी मिळाल्यास, कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन बचतीत लक्षणीय वाढ होईल.

 

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात ६ लाख रुपये शिल्लक असतील, तर ८.७५ टक्के व्याजदराने त्यांना साधारण ५० हजार ते ५२ हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते.

 

त्याचप्रमाणे, ज्यांच्या खात्यात ५ लाख रुपये आहेत, अशा कर्मचाऱ्यांना अंदाजे ४१ ते ४२ हजार रुपयांपर्यंत व्याजाचा लाभ मिळू शकतो. ही संपूर्ण रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होणार असल्याने त्यांच्या निवृत्ती निधीत भरीव वाढ होईल.

 

मागील २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारने पीएफवर ८.२ टक्के व्याजदर दिला होता. हा व्याजाचा पैसा आधीच बहुतेक कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.

 

मात्र वाढती महागाई, बँकांच्या एफडी दरांमधील बदल आणि इतर गुंतवणूक पर्यायांच्या तुलनेत पीएफ अधिक आकर्षक ठेवण्यासाठी सरकारकडून व्याजदर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

जरी सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी जानेवारीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.

 

त्यामुळे देशभरातील कोट्यवधी पीएफ खातेधारक या निर्णयाकडे उत्सुकतेने लक्ष ठेवून आहेत. व्याजदर वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेला मोठे बळ मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -