Saturday, December 13, 2025
Homeमहाराष्ट्रआनंदाची बातमी! हक्काचं घर हवंय? आता सरकार स्वतःची जागा नसलेल्यांनाही देणार घरकुल;...

आनंदाची बातमी! हक्काचं घर हवंय? आता सरकार स्वतःची जागा नसलेल्यांनाही देणार घरकुल; जाणून घ्या सविस्तर माहिती

प्रत्येक नागरिकाला (PM Gharkul Yojana) सुरक्षित आणि पक्के घर मिळावे, हे केंद्र आणि (Pradhanmantri Avas Yojana) राज्य शासनाचे प्रमुख ध्येय आहे. मात्र ग्रामीण (Gharkul) भागातील अनेक गरीब कुटुंबांकडे स्वतःची जागा नसल्यामुळे आतापर्यंत त्यांना घरकुल योजनांचा लाभ घेता येत नव्हता.

 

ही अडचण लक्षात घेऊन शासनाने महत्त्वाचा (Govt Home) निर्णय घेतला असून आता अशा लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी जागा खरेदी करता यावी, यासाठी 50 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. जागेच्या खरेदीची नोंदणीकृत कागदपत्रे सादर केल्यानंतर हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. (Breaking News)

 

गरीब जनतेला आधार

 

या योजनेसाठी शासनाने काही स्पष्ट नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार घरकुलासाठी किमान 600 चौरस फूट क्षेत्रफळाचा भूखंड असणे आवश्यक आहे. त्या भूखंडावर किमान 323 चौरस फूट ते कमाल 485 चौरस फूट क्षेत्रफळाचे घर बांधणे बंधनकारक राहणार आहे. अनेक गावांमध्ये वस्ती दाट झालेली असून जागेची उपलब्धता कमी आहे. तसेच मालकी हक्कासंबंधी अडचणीही आहेत. अशा परिस्थितीत योग्य भूखंड मिळवणे कठीण होत असल्याने जागा खरेदीसाठी मिळणारे हे अनुदान ग्रामीण गरीब कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

 

मोठ्या प्रमाणात घरकुलांचं वाटप

 

पंतप्रधान आवास योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून देशातील गरजू, गरीब आणि बेघर कुटुंबांना पक्के घर मिळावे, या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे आर्थिक मदत करतात. गेल्या दोन वर्षांत अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घरकुलांचे वाटप झाले असून गावागावांत घरबांधणीची कामे सुरू आहेत. खरीप हंगाम संपत आल्याने अनेक लाभार्थी आता घरकुल बांधकामाला सुरुवात करण्याच्या तयारीत आहेत.

 

नियम

 

घरकुलासाठी भूखंड आणि बांधकामाबाबत शासनाने स्पष्ट नियम ठरवले आहेत. घरामध्ये स्वयंपाकघर, एक किंवा दोन खोल्या आणि शौचालय असणे अनिवार्य आहे. घराचे क्षेत्रफळ ठरावीक मर्यादेत ठेवण्यात आले असून सर्व लाभार्थ्यांना किमान सुविधा मिळाव्यात, हा यामागील उद्देश आहे. घरकुल योजनेच्या निकषांमध्येही बदल करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात भूखंडाचे माप, घराचे क्षेत्रफळ आणि बांधकामाची रचना याबाबत अटी अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -