Thursday, December 18, 2025
Homeराजकीय घडामोडीएकनाथ शिंदेंना जबर हादरा, सामूहिक राजीनाम्यांनी शिवसेनेत खळबळ

एकनाथ शिंदेंना जबर हादरा, सामूहिक राजीनाम्यांनी शिवसेनेत खळबळ

राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे, त्यामुळे राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांनीही आपले राजीनामे वरिष्ठांकडे सुपूर्त केले आहेत.

 

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या मनमानी आणि एकतर्फी कारभाराला कंटाळून हा निर्णय घेतल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता प्रभारी जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्याने पदाधिकारी नाराज होते. तसेच पक्षवाढीसाठी मेहनत करणाऱ्या जिल्हाप्रमुख अतुल भगत यांना पदावरून दूर केल्याने ही नाराजी अधिक वाढली होती. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

 

उरण तालुका प्रमुख दीपक ठाकूर आणि पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ही आपले राजीनामे शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडे सोपवले आहेत. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे. आता हे पदाधिकारी कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आह.

 

धुळ्यातही शिवसेनेला फटका

धुळे महानगर पालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीची तयारी सुरू असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख संजय गुजराती यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश पार पडला. संजय गुजराती यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर दुसाने यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्षांतर झाल्याने धुळ्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -