पंतप्रधान मोदींनी तडकाफडकी राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आलाय (post)तसा मेसेजही प्रचंड व्हायरल होतोय…दिल्लीत काहीतरी घडतंय आणि मराठी माणूस पंतप्रधान होणार असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय…त्यामुळेच आता चर्चांना आणखी उधाण आलंय खरंच मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलाय का…? मोदींच्या राजीनाम्याबद्दल अजून माहिती बाहेर का आलेली नाही? यामध्ये काय तथ्य आहे हे सांगणं गरजेचं आहे…मोदींनी राजीनामा दिला तर पुढे कोण पंतप्रधान होणार…? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत…त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे…त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात
भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बदलल्यानंतर नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाचा (post)अचानक राजीनामा दिलाय. राजीनामा दिल्यानंतर खुर्चीसाठी शहा आणि योगींमध्ये रस्सीखेच सुरू आहे.हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली…याचं सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने माहिती मिळवली…त्यावेळी सरकारचं अधिकृत पोर्टल PIB फॅक्ट चेकवर माहिती मिळाली…त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुया.
व्हायरल सत्य काय?
मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिलेला नाही
मोदींनी राजीनामा दिल्याचा दावा खोटा
दिल्लीत बदल होणार या चर्चेमुळे मेसेज व्हायरल
मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असता तर जगभरात बातमी असती…(post)मात्र, तसं काहीही झालेलं नाही…सोशल मीडियावर काहीही दावे केले जातात…सध्या प्रत्येकाकडे मोबाईल असल्याने असे मेसेज वेगानं व्हायरल होतात…त्यामुळे आम्ही अशा व्हायरल मेसेजची पडताळणी करून सत्यता समोर आणतो…आमच्या पडताळणीत मोदींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याचा दावा असत्य ठरलाय…





