Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रखुशखबर! सोन्याचा भाव धाडकन आला खाली, 10 ग्रॅमसाठी द्यावे लागणार फक्त…, वाचा...

खुशखबर! सोन्याचा भाव धाडकन आला खाली, 10 ग्रॅमसाठी द्यावे लागणार फक्त…, वाचा नवा भाव काय?

सोने आणि चांदीच्या भावत रोजच चढउतार झालेले पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तर या दोन्ही मौल्यवान धातूंचा भाव चांगलाच वाढला आहे. दरम्यान, आज मात्र सोन्याचा भाव धाडकन खाली आला आहे. सोबतच चांदीचा भावही पडला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार आज सोने आणि चांदीचा भाव कमी झाले. सोमवारी वायदा बाजारात चांदीचा भाव आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या तुलनेत साधारण तीन टक्क्यांनी घसरून 2.32 लाख रुपये प्रति किलोवर स्थिरावला.

 

तंतोतंत सांगायचे झाल्यास आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीचा भाव 7124 रुपयांनी (2.97 टक्के) घसरून 2,32,663 रुपयांपर्यंत खाली आला. बाजार चालू झाल्यानंतर सोने आणि चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर लोकांनी नफावसुली केली.

 

त्यामुळे नंतरच्या वेळेत या दोन्ही धातूंचा भाव खाली आला. सोन्याच्या भावात 4 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. तंतोतंत सांगायचे झाल्यास आज सोन्याचा भाव 1497 रुपयांनी (1.07 टक्के) कमी होऊन 1,38,376 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -