Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्र15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी; मात्र मतदानासाठी 'या' कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा नाही;...

15 जानेवारीला राज्यात सार्वजनिक सुट्टी; मात्र मतदानासाठी ‘या’ कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा नाही; सुट्टीऐवजी…

राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारी रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार, कर्मचाऱ्यांना या दिवशी सुट्टी किंवा सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

तसे परिपत्रक उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केला आहे.

 

महानगरपालिका क्षेत्रातील केंद्र सरकारची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका, शैक्षणिक तत्सम आस्थापनांनाही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असे सामान्य प्रशासन विभागाच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार, निवडणूक क्षेत्रात तसेच क्षेत्राबाहेर कार्यरत असलेल्या सर्व कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात यावी, असे आदेश आस्थापनांना देण्यात आले आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने, हॉटेल, निवासस्थाने, आयटी कंपन्या, मॉल, शॉपिंग सेंटर, किरकोळ विक्रेते आदींना हे आदेश लागू राहणार आहेत.

 

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान तीन तासांची विशेष सशुल्क सवलत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात सूचित करण्यात आले आहे.

 

उद्या होणार मतदान

 

६ आणि ७ जानेवारी रोजी झालेल्या निवडणूक आढावा बैठकीत या सूचना जारी करण्यात आल्या, ज्यात आयोगाचे सचिव सुरेश काकानी, पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह सर्व २९ महानगरपालिकांचे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर, जळगाव आणि धुळे यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये महापालिका निवडणुका होणार आहेत. मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, लहान मुलांसोबत असलेले एकल पालक, गर्भवती महिला आणि मतदारांच्या इतर दुर्बळ घटकांना प्राधान्य दिले जाईल. मतदारांना गैरसोय होऊ नये यासाठी मतदान केंद्रांवर विश्वसनीय वीजपुरवठा, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालयाची सोय आणि रॅम्पची व्यवस्थाही असेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -