Friday, January 16, 2026
Homeमहाराष्ट्रना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार...

ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; ‘आधार स्कॅम’पासून राहा सावध

स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवनवीन पद्धती शोधून काढत आहेत. फसवणुकीचा एक असा मार्ग समोर आला आहे, ज्यामध्ये ना कोणत्याही OTP ची गरज लागते, ना PIN ची. ‘आधार इनेबल पेमेंट सिस्टम’ (AEPS) द्वारे आता फसवणूक होत आहे.

 

या प्रकारच्या स्कॅममध्ये केवळ खातेदाराची आर्थिक फसवणूकच होत नाही, तर गुन्हेगार या खात्यांचा वापर ‘म्यूल अकाऊंट’ (Mule Account) म्हणूनही करतात.

 

AEPS फ्रॉड कसा होतो?

 

स्कॅमर्स सर्वात आधी लोकांचा आधार डेटा, फिंगरप्रिंट्स आणि इतर वैयक्तिक माहिती चोरतात. यासाठी ते अनेकदा लीक झालेल्या डेटाचा वापर करतात. त्यानंतर चोरलेल्या डेटाच्या आधारे ते एक बनावट फिंगरप्रिंट तयार करतात आणि AEPS मायक्रो-एटीएमवर त्याचा वापर करतात. या तंत्राच्या मदतीने स्कॅमर्स तुमच्या खात्यातील संपूर्ण रक्कम लंपास करू शकतात.

 

म्यूल अकाऊंट (Mule Account) म्हणजे काय?

 

अशी बँक खाती जी अनेकदा खातेदाराने भाड्याने दिलेली असतात किंवा ज्यांचा ताबा स्कॅमर्सनी मिळवलेला असतो, त्यांना ‘म्यूल अकाऊंट’ म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर स्कॅमर्स तुमचं खातं भाड्याने घेऊ शकतात किंवा त्याचा एक्सेस मिळवून बेकायदेशीर व्यवहारांसाठी वापर करू शकतात.

 

या फसवणुकीला कसं रोखता येईल?

 

‘बीएलएस ई-सर्विसेस’ (BLS E-Services) चे अध्यक्ष शिखर अग्रवाल यांच्या मते, AEPS फ्रॉड रोखण्यासाठी GPS इनेबल डिवाइसेस हा सर्वोत्तम पर्याय आहे. या उपकरणांमुळे व्यवहार एका निश्चित ठिकाणाहूनच होऊ शकतो. जर पेमेंटची रिक्वेस्ट रजिस्टर्ड सर्व्हिस एरिया बाहेरू आली, तर ते पेमेंट होत नाही.

 

या GPS आधारित उपकरणांमुळे केवळ बँकिंग फ्रॉडच थांबत नाहीत, तर बँका आणि NPCI ला देखील मदत मिळत आहे. या डेटाच्या आधारे ज्या भागांत जास्त फ्रॉड होत आहेत, त्या गावांची किंवा ब्लॉक्सची ओळख पटवून तेथील सुरक्षा वाढवता येते. भविष्यात यामध्ये AI आणि बायोमॅट्रिक लायव्हेनेस चेक यासारखी तंत्रज्ञानं जोडून बनावट फिंगरप्रिंटचा वापर पूर्णपणे रोखला जाऊ शकतो.

 

तुम्ही स्वतःचा बचाव कसा करू शकता?

 

बायोमॅट्रिक्स लॉक करा: या फ्रॉडपासून वाचण्यासाठी सतर्क राहणं हाच उपाय आहे. तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे आधार बायोमॅट्रिक्स लॉक करू शकता.

 

अनधिकृत केंद्र टाळा: कोणत्याही बनावट किंवा अनधिकृत केंद्रावर आधार अपडेट करू नका.

 

आधारची माहिती सुरक्षित ठेवा: आपला आधार नंबर किंवा त्याची प्रत अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका.

 

झेरॉक्स काढताना काळजी घ्या: अनेकदा आपण दुकानात आधारकार्डची झेरॉक्स काढतो आणि दुकानदाराने ती प्रत स्वतःकडे ठेवली तर ते धोकादायक ठरू शकतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -