Friday, January 16, 2026
Homeइचलकरंजीइचलकरंजी : मतमोजणी प्रक्रिया 10 वाजता सुरु होणार : वाचा सविस्तर

इचलकरंजी : मतमोजणी प्रक्रिया 10 वाजता सुरु होणार : वाचा सविस्तर

इचलकरंजी:

राजीव गांधी भवनमध्ये शुक्रवारी (दि.१६) सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात होईल. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती येईल, मतमोजणी पहिल्या व तळमजल्यावर होणार आहे. ४ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली एकाच वेळी ४ ठिकाणी मतमोजणीस सुरुवात होईल. प्रत्येक फेनीला एका प्रभागातील २ ईव्हीएम मशीनवरील मतदान मोजले जाईल. म्हणजेच एका विभागात ८ टेबलांद्वारे मतमोजणी होईल. त्यामुळे प्रत्येक फ `रीत ३२ ईव्हीएम मशीनवरील मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक उमेदवाराच्या २ प्रतिनिधींना मतमोजणीसाठी प्रवेश दिला जाईल.

मतदानाची अंतिम टक्केवारी 69.76 टक्के

इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शहरात एकूण 69.76 टक्के मतदान झाल्याची अंतिम अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळपासूनच विविध प्रभागांतील मतदान केंद्रांवर मतदारांची रांग पाहायला मिळाली. विशेषतः महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला.

दिवसभरात मतदानाचा टक्का हळूहळू वाढत गेला. सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग काहीसा मंद होता, मात्र दुपारनंतर वातावरणात चैतन्य आले आणि मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. प्रशासनाकडून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची मोठी घटना नोंदवली गेली नाही.

मतदानाची टक्केवारी समाधानकारक असल्याचे चित्र असून, शहराच्या विकासाबाबत नागरिकांमध्ये असलेली जागरूकता यातून स्पष्ट होते. आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, इचलकरंजीच्या सत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -