नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
मित्रांनो, घरातील मुलांच्या बाबतीत आपण खूप काळजी करीत असतो. त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत असू दे वा त्यांच्या प्रगतीच्या बाबतीत. घरातील मुले आजारी पडले की, आपले कशातच लक्ष लागत नाही. तसेच मुले जर अभ्यासात देखील कमी पडू लागली की त्याचा त्रास आपल्यालाच होऊ लागतो. आपणाला त्यांची काळजी वाटायला सुरुवात होते.
मुले भरपूर शिकून काहीतरी मोठे करून दाखवावेत असे प्रत्येक पालकांची इच्छा असते. परंतु काही मुले पालकांच्या या इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ राहतात. कारण त्यांचे अभ्यासाकडे लक्ष नसते. पालक कितीही ओरडले तरी ते लक्ष देत नाहीत. मुलांची चिडचिड घरात राहिल्याने घरातील वातावरण देखील अशांत राहते. त्यामुळे आपल्याला खूपच मुलांची काळजी वाटायला लागते.
तर मित्रांनो मुलांचे अभ्यासात लक्ष लागावे, त्यांची चिडचिड कमी व्हावे यासाठी तुम्हाला मी आज एक उपाय सांगणार आहे. हा उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. कोणत्याही अमावस्येला हा उपाय केला तरी चालतो. अमावस्येच्या दिवशी तुम्हाला दुपारी बाराच्या आत हा उपाय करायचा आहे. म्हणजे सकाळी कितीही वाजता तुम्ही हा उपाय केला तरी चालतो. परंतु बाराच्या आत तुम्हाला हा उपाय पूर्ण करायचा आहे.
यासाठी आपणाला भात लागणार आहे. एक वाटी तांदूळ घेऊन त्यात मीठ न घालता तुम्हाला भात करायचा आहे. हा भात तुम्हाला एका वाटीत काढून घेऊन त्या वाटीने च मुलांच्या वरून ओवाळून घ्यायचा आहे. तुम्ही मुलांना बसवून किंवा उभारून देखील तुम्ही तो भात तुमच्या मुलांवरून ओवाळून घेऊ शकता. तर हा भात घड्याळाचे काटे जसे गोल फिरतात त्याप्रमाणे तुम्हाला मुलांच्या वरून ओवाळून घ्यायचा आहे.
म्हणजेच डोक्यापासून पायापर्यंत गोल ओवाळून घ्यायचा आणि लगेचच बाहेर जाऊन एका कागदामध्ये किंवा एका पानांमध्ये तो पाहात काढून टेरेसवर किंवा बाहेर तुम्ही पक्षांसाठी तसाच ठेवून द्यायचा आहे. परंतु तो भात कुत्री खाणार नाहीत फक्त पक्षीच खातील अशा ठिकाणी ठेवून द्यायचा आहे. ओवाळून झाल्यानंतर तुम्ही क्षणभर देखील न थांबता बाहेर लगेचच येऊन तो भात पक्षांसाठी ठेवायचा आहे. तर हा उपाय तुम्ही दर अमावस्येला करू शकता. आपल्या मुलांची प्रगती व शिक्षणात त्यांचे लक्ष लागावे यासाठी नक्की करून पहा.






