Friday, January 23, 2026
Homeइचलकरंजीहुपरी: जि.प.साठी इच्छुक उमेदवाराच्या फोटोवर करणी, भानामतीचा प्रकार

हुपरी: जि.प.साठी इच्छुक उमेदवाराच्या फोटोवर करणी, भानामतीचा प्रकार

रेंदाळ जिल्हा परिषद मतदार संघातील शिवसेना (शिंदे सेना) पक्षाचे इच्छुक उमेदवार व युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव यांचा फोटो वापरून रविवारी अमावास्येच्या रात्री अज्ञाताने करणी, भानामती करण्याचा अघोरी प्रकार केला आहे.

 

अशा अघोरी कृत्याच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा व भीतीयुक्त वातावरण पसरवण्याचा उद्योग करणार्‍या भामट्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवाजी जाधव यांनी हुपरी पोलिसांकडे केली आहे.

 

शिवाजी जाधव शिवसेनेकडून न रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी तयारी केली आहे. त्यांच्या कार्याची भीती निर्माण झालेल्या अज्ञाताने हा प्रकार केला आहे. पिवळा भात, अर्धी केळी, काळी बाहुली व जाधव यांचा फोटो यांचा त्यात समावेश आहे. यळगूड रस्त्यावरील एका स्टील विक्रीच्या गोडावूनसमोर हा प्रकार रविवारी अमावास्येच्या रात्री केल्याचा सोमवारी सकाळी आढळून आला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -