सोन्यापाठोपाठ आता चांदीनेही सामान्यांच्या आवाक्याबाहेर झेप घेतली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि औद्योगिक मागणीच्या जोरावर सोमवारी (दि. 19) चांदीने तीन लाख तीन हजार प्रति किलो हा ऐतिहासिक टप्पा पार केला.
विशेष म्हणजे ही वाढ अवघ्या 75 दिवसांत झाली आहे. 4 नोव्हेंबर 2026 रोजी 1.50 लाखांच्या घरात असलेली चांदी आता थेट दुप्पट झाली असून या ’सुसाट’ दरवाढीने गुंतवणूकदार आणि सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
का वाढली चांदी?
चांदीच्या या दरवाढीमागे केवळ सट्टा नसून ठोस जागतिक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग््राीनलँडच्या मुद्द्यावरून युरोपीय देशांवर लादलेल्या आयात शुल्कामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण झाली आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातून चांदीची खरेदी वाढली आहे.
आधुनिक जगात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (अख) चे सर्व्हर्स आणि सौर ऊर्जा पॅनेलच्या उत्पादनात चांदीचा वापर अनिवार्य झाला आहे. खाणीतून निघणारी चांदी आणि वाढती मागणी यात मोठी तफावत निर्माण झाली आहे. जागतिक साठवणूक केंद्रांमधून प्रत्यक्ष चांदीचा साठा वेगाने रिकामा होत असून, टंचाईमुळे चांदीच्या किमती वेगाने वाढत आहेत.
– राजेश राठोड, अध्यक्ष कोल्हापूर सराफ व्यापारी संघचांदी आता केवळ दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही; तर ती एक औद्योगिक गरज बनली आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी प्रचंड असल्याने किमतीत ही वाढ दिसत आहे. मात्र 75 दिवसांत दर दुप्पट होणे हे अनपेक्षित असून कोल्हापूरच्या बाजारपेठेतील चांदी कारागिरी ठप्प झाली आहे. भांडवलाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय वाढीव दरामुळे मागणीही नसल्याने व्यापाराची कोंडी निर्माण झाली आहे




