Friday, January 30, 2026
Homeमहाराष्ट्रफेब्रुवारीचे धान्य रेशन दुकानांत पोहोचले; कार्डधारकांना कधीपासून आणि कोणकोणते धान्य मिळणार?

फेब्रुवारीचे धान्य रेशन दुकानांत पोहोचले; कार्डधारकांना कधीपासून आणि कोणकोणते धान्य मिळणार?

शिधापत्रिकाधारकांना दि. ५ फेब्रुवारीपासून धान्याचे वितरण सुरू होणार आहे. शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आवश्यक धान्याचा साठा उपलब्ध झाला असून वितरणासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनकार्डधारकांना वेळेत साखर, तांदूळ आणि गहू मिळावेत, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

 

ई-पॉस मशीनद्वारे माहिती अद्ययावत झाल्यानंतरच फेब्रुरवारीचे धान्य वाटप सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता राहील.

 

मशीन अपडेटची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शहरातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांकडे धान्य पोहोचले असून, अद्ययावत प्रक्रिया पूर्ण होताच लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जाईल.

 

धान्य वाटप सुरळीत पार पाडण्यासाठी पुरवठा विभागाकडून सतत देखरेख ठेवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शिधापत्रिका धारकांना ५ फेब्रुवारीपासून वाटप, गहू तांदूळ आणि साखर मिळणार आहे.

 

ज्वारीचे वाटप केले बंद

◼️ कोणत्याही तक्रारी असल्यास संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, अशा सूचनाही दिल्या आहेत.

◼️ नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात धान्य वितरणास विलंब झाला होता.

◼️ यापूर्वी सर्वसाधारण रेशनकार्डधारकांना ज्वारी, गहू व तांदूळ दिले जात होते.

◼️ मात्र, जानेवारीपासून धान्य वाटपात बदल होत आहे आणि ज्वारीचे वाटप बंद करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -