Friday, January 30, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर: कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

कोल्हापूर: कॅफेमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

कळंबा येथील आयटीआय कॉलेजसमोरील सनशाईन कॅफे आणि निसर्ग लॉजमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना गुरुवारी उघडकीला आली. याप्रकरणी करवीर पोलिसांनी संशयित ओम संभाजी मुगडे (19, रा.नरके कॉलनी, कळंबा, ता.करवीर) याला अटक केली. मे, जून, ऑगस्ट 2025 मध्ये हा प्रकार घडला.

 

लग्नाचे आमिष दाखवून वारंवार केलेल्या अत्याचारामुळे अल्पवयीन पीडिता आठ महिन्याची गर्भवती असल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. मुलीच्या असहायतेचा गैरफायदा घेत संशयिताने कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. संशयिताकडून पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच पालकांनी करवीर पोलिस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार संशयिताने कळंबा येथील आयटीआय कॉलेजसमोरील सनशाईन कॅफे आणि निसर्ग लॉजमध्ये वारंवार नेऊन अत्याचार केल्याचे म्हटले आहे. अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून दोषींना सहआरोपी करण्यात येणार असल्याचेही तपासाधिकारी शिंदे यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीवर कॅफेमध्ये अत्याचाराचा प्रकार घडल्याने कळंबा परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -