Tuesday, February 10, 2026
Homeमहाराष्ट्रपीएफ धारकांसाठी गुड न्यूज! आता ८ दिवसांत PF काढता येणार

पीएफ धारकांसाठी गुड न्यूज! आता ८ दिवसांत PF काढता येणार

नोकरी करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. (holders)कर्मचारी भविष्य निधी संघटना अंतर्गत पीएफ काढण्याची प्रक्रिया आता अधिक वेगवान झाली असून, योग्य कागदपत्रे आणि केवायसी पूर्ण असल्यास अवघ्या 8 दिवसांत रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत करण्यात आलेल्या डिजिटल सुधारणांमुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली आहे.याआधी पीएफ काढण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत होती. कंपनीची मंजुरी, प्रोफाइलमधील त्रुटी किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे क्लेम अडकून पडत होते. मात्र, आता आधार-आधारित केवायसी, बँक तपशील आणि यूएएन योग्य प्रकारे लिंक असल्यास क्लेम प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार आहे. (holders)त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत.

 

नव्या प्रणालीमुळे फेस ऑथेंटिकेशन, ऑनलाइन क्लेम फायलिंग आणि स्वयंचलित पडताळणी प्रक्रियेमुळे पीएफ क्लेम्सचा निपटारा झपाट्याने होत आहे. ऑगस्ट 2025 पासून यूएएन तयार करताना फेस व्हेरिफिकेशन बंधनकारक करण्यात आले असून, उमंग अॅपद्वारे कर्मचारी स्वतःच यूएएन ॲक्टिव्हेट करू शकतात.(holders) यामुळे एजंट किंवा कार्यालयांवर अवलंबून राहण्याची गरज कमी झाली आहे.ई-केवायसी पूर्ण असलेल्या कर्मचाऱ्यांना आता पीएफ ट्रान्स्फरसाठी जुन्या किंवा नव्या कंपनीच्या मंजुरीची आवश्यकता नाही.कर्मचारी थेट ऑनलाइन पद्धतीने क्लेम दाखल करू शकतात. तसेच, सेंट्रलाइज्ड पेन्शन सिस्टिममुळे देशातील कोणत्याही शेड्युल्ड बँकेतून पेन्शन मिळणे शक्य झाले आहे, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -