ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळा रोडवर वाघबीळ घाटात गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी थांबलेल्या युवकास एलसीबीच्या पथकाने मंगळवारी
अटक केले. एक पिस्तूल, जिवंत राऊंड, मोबाईल असा ५२ हजारांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला.
दिलीप मारुती पाटील (रा. बांबरवाडी, ता. पन्हाळा) असे
संशयिताचे नाव आहे. जिल्ह्यातील अवैध हत्यारे तस्करांवर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हेचे पो. नि. प्रमोद जाधव यांनी पथक नेमले आहे. या पथकातील संदीप कुंभार यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उपनिरीक्षक विनायक सपाटे, अजय गोडबोले, सुनील कवळेकर, अजय वाडेकर, संदीप कुंभार, अमोल कोळेकर आदींनी वाघबीळ घाटात सापळा रचून दिलीपला अटक केली.
कोल्हापूर पिस्तूल विक्रीप्रकरणी युवकास अटक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -