Thursday, April 25, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर गुंगीचे औषध देऊन बलात्कार सहा जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर गुंगीचे औषध देऊन बलात्कार सहा जणांवर गुन्हा दाखल

ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्लॅट नावावर करून देतो असे सांगून, महिलेला पेयातून गुंगीचे औषध प्यायला देवून, तिला मारहाण करून बलात्कार केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ४ व ५ ऑक्टोबर २०२१ या कालवधीत केर्ली ता.करवीर येथील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. शाहपुरी परिसरात राहणाऱ्या पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलीम हरूण मुल्ला, महंमद मुजावर, शामराव पांढरे (तिघे रा. लक्षतीर्थ वसाहत), जयराम येडगे हॉटेल मधील दोन कामगार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी, पिडीत महिला व संशयित यांची ओळख आहे. पिडीतेला प्लॅट नावावर करून देतो असे सांगून, ४ ऑक्टोबर २०२१ रोजी सलीम मुल्ला, महंमद मुजावर, शामराव पांढरे यांनी त्यांना शाहपुरी येथील घरातून कारमध्ये बसवून, शिवाजी पूल मार्गे ते आंबेवाडी येथे आले तेव्हा सलीम मुल्ला याने पिडीतेला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले.
त्यानंतर केर्ली येथील एका हॉटेलमध्ये मारहाण करून तिघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तर हॉटेल मधील दोघा कामगारांनी मारहाण केली. ५ ऑक्टोबर रोजी मुल्ला, मुजावर, पांढरे यांनी पीडितेच्या घरात जाऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केला. असे पीडीत महिलेने करवीर पोलिस दिलेल्या फिर्यादीनुसार सहा संशयितांवर मारहाण करून, बलात्कार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक गीता पाटील करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -