Saturday, July 27, 2024
Homeइचलकरंजीकोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढते बुधवारी 69 कोरोना, 4 ओमिक्रोन बांधीत ...

कोल्हापूर जिल्ह्याची चिंता वाढते बुधवारी 69 कोरोना, 4 ओमिक्रोन बांधीत ( इचलकरंजीत दोन नव्या रुग्णांची भर )

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस सलगपणे कोरोना आणि
ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे. यापुढे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही सक्रीय होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात बुधवारी (ता.५जानेवारी) कोरोनाबाधितांची संख्या ६९ वर पोहोचली असून सक्रीय रुग्णसंख्याही आता २३८ वर गेली आहे. दोन दिवसात झपाटयाने रुग्णसंख्या वाढल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज ४ रुग्णांचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्ग रुग्णांची संख्येत भर पडत असल्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

इचलकरंजीत नव्या दोन रूग्णांची भर इचलकरंजी शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांची भर पडत जात असल्यामुळे शहर वासियांची चिंता वाढू लागली आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन नवे रूग्ण आढळून आले. त्यामध्ये आवाडे अपार्टमेंट परिसर तर बीजेपी मार्केट या भागातील रूग्णांचा समावेश आहे. सध्या १६ अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आता कठोर भूमीका घेणे अपरिहार्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यात र बुधवारी १२४५ जणांच्या कोरोना । चाचण्या घेण्यात आल्या, त्यामध्ये कोरोनाचे ६९ नवे बाधित रुग्ण आढळून आले.३जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या आता २३८ वर पोहोचली. आज मात्र जिल्ह्यात १ जण कोरोना बळी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -