लग्राचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्मय विक्रम बनसोडे (वय २२, रा. तोरणानगर, शहापूर, असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरटीओ सेवा बंद होणार? १६ जूनपासून राज्यभरात बेमुदत संपाची हाक.नेमकं प्रकरण काय?
संशयित बनसोडे याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही संशयित आरोपी तन्मय बनसोडे याने तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. जून २०२५ पासून ते आजतागायत त्याने पीडितेला लग्राचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. यामध्ये ऑक्टोबर २०२५ मध्ये शहापूर येथील मित्राच्या रूमवर, तसेच नोव्हेंबर आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये हातकणंगले येथील एका लॉजवर आणि स्वतःच्या राहत्या घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
सोलापूरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा
काही दिवसांनंतर पीडितेने लप्राबाबत विचारणा केली असता, आरोपीने लग्न करण्यास नकार दिला. तसेच, याबाबत जर कोणाला काही सांगितले, तर तुझी बदनामी करेन अशी धमकी पीडितेला दिली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीवरून शहापूर पोलिसांनी संशयित आरोपी तन्मय बनसोडे याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहापूर पोलीस करत आहेत.
अनैतिक संबंधातून महिलेचे भयंकर कृत्य, ७ महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या नंतर…





