Monday, September 25, 2023
Homeकोल्हापूरयड्रावकरांच्या गाडीचा नंबर ९८ आणि मतेही ९८; जयसिंगपुरात जल्लोष

यड्रावकरांच्या गाडीचा नंबर ९८ आणि मतेही ९८; जयसिंगपुरात जल्लोष

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा झालेल्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर हे ९८ मतांनी विजयी झाल्याने जयसिंगपूरसह शिरोळ तालुक्यात जल्लोष साजरा केला जात आहे. तर दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांना ५१ मते मिळाल्याने सर्वपक्षीय नेत्यांचे पानिपत झाले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सेवा संस्था गटाचा निकाल लागला आहे. राजेंद्र पाटील-यड्रावकर ४७ मतांनी विजयी झाले आहेत. याची खात्री असल्यानेच यड्रावकर समर्थकांनी मतदानादिवशी मोठमोठे फ्लेक्स व फटाक्यांची आतषबाजी केली होती. जयसिंगपूर येथील यड्रावकर चेंबर्समध्ये समर्थकांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला आहे. मतदानानंतर रात्रीच जिल्हा बँकेचे उमेदवार राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या विजयाचे फलक जयसिंगपूर शहरात लावण्यात आले.

यड्रावकरांच्या गाडीचा नंबरही ९८ आणि मतेही ९८
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या गाडीचा नंबर ९८८९ आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणूकीत त्यांना ९८ मते पडली आहे. हे वैशिष्ट्य आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र