पुण्याच्या जेजुरीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. आषाढी वारीदरम्यान जेजुरीमध्ये सोमवारी सकाळी भीषण दुर्घटना घडल्याचे समोर आलं आहे. एका भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिली. या घटनेत 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज संत ज्ञानेश्वरांची पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान होत आहे. या वारीवर भंडाऱ्याची उधळण केली जाते. याच वारीतील टेम्पो चालकाकडून अनियंत्रित झाला. त्यानंतर हा टेप्म्पो एका दिंडीत घुसला. या दिंडीत महीलांसहित पुरुष वर्ग होता. टेम्पोच्या धडकेमुळे अनेक वारकरी गंभीर जखमी झाले. याच दिंडीतील तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर जखमी वारकऱ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.

