चाकूचा धाक दाखवून बलात्कार

ताजी बातमी /ऑनलाइन टीम
भरदिवसा घरात घुसून चाकूचा धाक दाखवत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना पाचगाव (ता. करवीर) येथील केएमटी कॉलनी परिसरात घडली. याप्रकरणी अमित पाटील याच्याविरुद्ध करवीर पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला.

घटनेनंतर तरुण घराला बाहेरून कडी लावून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संशयित पाचगाव, मोरेवाडी परिसरातील माहीतगार असावा, असा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

जाडर बोबलाद (ता. जत) येथील दाम्पत्य मोलमजुरीसाठी चार वर्षांपूर्वी येथे वास्तव्याला आले आहे. शुक्रवारी सकाळी पती कामाला गेल्याने पीडिता एकटीच घरी होती.

दुपारी साडेबाराच्या सुमारास संशयित अमित पाटील अचानक घरात घुसला. दाराला त्याने आतून कडी लावली. महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला; पण चाकूचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार केला.

याप्रकरणी पीडित महिलेने करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave a Reply

Join our WhatsApp group