Thursday, March 28, 2024
HomenewsRelationship Tips: नात्यातील दुराव्यानंतर या ३ गोष्टीचा विचार सोडणं गरजेचं

Relationship Tips: नात्यातील दुराव्यानंतर या ३ गोष्टीचा विचार सोडणं गरजेचं


घटस्फोट हा प्रत्येकासाठीच वेदनादायक असतो, यात काहीच शंका नाही. कारण कुणीही आपलं नातं हे पुढे जाऊन तोडण्यासाठी सुरु करत नाही. ही गोष्ट वेगळी आहे की, प्रेम-त्याग आणि एडजस्टमेंट या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही जर नातं टिकत नसेल तर काही कपल अखेर वेगळं होण्याचा निर्णय घेतात.


अयशस्वी वैवाहिक जीवन सुरु ठेवत स्वत:ला त्रास करुन घेण्यापेक्षा दोघांच्या संमतीने नातं संपवून नव्याने सुरुवात करणं चांगले आहे. पण वेदनादायक घटस्फोटानंतर पुनर्विवाहाचा निर्णय घेणं देखील सोपे नसतं.


घटस्फोट घेणारे बहुतेक जोड्या वेदना, दु:ख आणि नकारात्मकतेसारख्या भावनेतून जात असतात, ज्यामुळे मग ते एकटं राहणंच पसंत करतात. लोकांना हे समजणं गरजेचं आहे की, घटस्फोट घेणं ही अपमानास्पद गोष्ट नाही.


ही गोष्ट खरी आहे की, घटस्फोट आणि ब्रेकअप सारख्या गोष्टीचा त्रास होतो आणि या गोष्टीतून बाहेर पडायला वेळ लागतो. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुमचं आयुष्यचं संपलं आहे. यादरम्यान तुमच्याकडे संधी असते की तुम्ही आयुष्य नव्या पद्धतीने सुरु करण्याचा विचार करावा
लग्न ही चूक नाही


घटस्फोटानंतर बऱ्याचदा लोक असं ठरवतात की, जोडीदार निवडण्यात आपली चूक झाली असेल. मी कमी वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला. मी प्रेमात ही चूक केली. मला या गोष्टींचा पश्चाताप आहे. हे आणि असे असंख्य विचार नात्यात दुरावा आल्यानंतर व्यक्तीच्या मनात येऊ शकतात.


घटस्फोट झाल्यानंतर असे विचार करु स्वत:ला त्रास करुन घेणं चुकीचे आहे. कारण लग्न करणं हा कधीच चुकीचा निर्णय असू शकत नाही. कधीकधी विवाहीत जीवनात दोघांकडून गोष्टी बॅलेंस होत नाहीत.ज्यामुळे दोघांमध्ये दुरावा येतो. पण अशा लोकांना हे समजले पाहिजे की, दोघांनी जो काही वेळ एकत्र घालवला तो बेस्ट होता. अशा परिस्थितीत जुन्या गोष्टी आठवून स्वतःला त्रास देणं टाळायला हवं.


नातं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही
घटस्फोटाला प्रेमात आलेलं अपयश समजणं चूकीच आहे. कधी -कधी लग्नानंतरचं नातं कायम ठेवणं तेव्हा कठीण होत जेव्हा दोन व्यक्ती त्या नात्यात पूर्णपणे जोडले गेले नसतील. एकमेकांना दोष देऊन काहीही उपयोग होत नाही.


जर घटस्फोटानंतर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नातं वाचवण्याचा प्रयत्न केला नाही तर अशा गोष्टी तु्म्हाला नंतर त्रास देऊ शकतात. अशावेळी तुम्ही आपण आधीच्या नात्यात काय चुका केल्या याचा विचार करणं गरजेचं असतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -