Ind Vs Eng 2nd Test : रुट-बेअरस्‍टाे यांची शतकी भागीदारी

Ind Vs Eng 2nd Test तिसर्‍या दिवशाच्‍या पहिल्‍या सत्रात रुट आणि बेअरस्‍टो यांनी इंग्‍लंडच्‍या डावाला आकार दिला. दुसर्‍या दिवस अखेर इंग्‍लंडने ३ विकेट गमावत ११९ धाव केल्‍या होत्‍या. जो रुट ४८ धावांवर तर जॉने बेअरस्‍टो ६ धावांवर खेळत होता. तिसर्‍या दिवशाच्‍या पहिल्‍या सत्रात रुट आणि बेयरस्‍टो यांनी १८१ चेंडूत १०० धावांच्‍या भागीदारी केली. या भागीदारीमुळे इंग्‍लंडने ३ बाद २०९ धावा केल्‍या.
भारत आणि इंग्‍लंडमधील दुसर्‍या कसोटीच्‍या पहिल्‍या दिवशी सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दमदार कामगिरी केली. या दोघांची १२६ धावांची भागीदारी केली होती. या जोरावर पहिल्‍या दिवसाचा खेळ संपल्‍यानंतर भारताने ३ बाद २७६ धावा केल्‍या.
दुसर्‍या दिवसाचा खेळ सूरु झाल्‍यावर पहिल्‍या दिवशी दमदार खेळी करणारा केएल. राहुल १२९ धावांवर बाद झाला. यापाठोपाठ अजिंक्‍य रहाणेही केवळ एक धावा काढून तंबूत परतला. यानंतर ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजाने डाव सावरण्‍याचा प्रयत्‍न केला. भारताचा पहिला डाव ३६४ धावांमध्‍ये आटोपला.
इंग्‍लंडचा वेगवान गोलंदाज जेम्‍स अँडरसन याने ६२ धावांमध्‍ये भारताच्‍या पाच फलंदाजांना बाद केले. ओली रॉबिन्‍सन आणि मार्क वुड यांनी प्रत्‍येकी दोन तर मोईन आली याने एक बळी घेतला होते.

इंग्‍लंडने आपल्‍या पहिल्‍या डावाची सुरुवात सावधपणे केली. मात्र भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्‍मद सिराज याने दुसर्‍या दिवशीच्‍या अखेरच्‍या सत्रात इंग्‍लंडला सलग दोन धक्‍के दिले. सिराजने सलग दोन चेंडूमध्‍ये इंग्‍लंडच्‍या सिबली आणि हसीब हमीद यांना तंबूत धाडलं. यानंतर मोहम्‍मद शमीने तिसरा बळी घेतला हाेता.

Leave a Reply

Join our WhatsApp group