Thursday, June 1, 2023
Homenewsदोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता:

दोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता:

दोन दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता येत्या दोन ते तीन दिवसात राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पावसाचा जोर मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता पुढच्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाचा मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात व मराठवाड्यातील पिक पाऊस नसल्यामुळे वाळुन जात आहेत.


या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं वाचू शकतात.
हे जिल्हे आहेत यलो अलर्टमध्ये ठाणे, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.


१८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट आहे.


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसात असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे.
तसेच कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group