Friday, June 2, 2023
Homenewsमुलीनेच केली मित्रांच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या...

मुलीनेच केली मित्रांच्या मदतीने स्वतःच्या वडिलांची हत्या…

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यत्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे.

प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या केली असल्याचे समोर आले आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात होता. याच रागातून तिने हि हत्या केली आहे. काय आहे प्रकरण? ग्वाल्हेरमधील थाटीपूर भागात ४ ऑगस्ट रोजी हि घटना घडली.

यामध्ये तृप्तीनगर परिसरात राहणाऱ्या रवीदत्त दुबे नावाच्या व्यक्तीची राहत्या घरात गोळी झाडून हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ज्यावेळी त्यांची हत्या झाली तेव्हा रवीदत्त यांची पत्नी दोन्ही मुली आणि मुलगा हे सर्व घरातच होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांना जाग आली. तेव्हा रवीदत्त यांच्या पोटात गोळी लागल्याने रक्तस्राव होत असल्याचं त्यांना दिसले. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्याअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.



धाकट्या मुलीचे तरुणाशी प्रेमसंबंध घरातील पहिल्या मजल्यावर घुसून एखाद्याची हत्या झाली, आणि तोपर्यंत घरात कोणालाच समजलं नाही, यावर पोलिसांचा विश्वास बसत नव्हता. यानंतर पोलिसांनी कुटुंबियांचे कॉल रेकॉर्ड तपासले. तेव्हा धाकट्या मुलीचे पुष्पेंद्र नावाच्या तरुणाची गेल्या दोन आठवड्यात सर्वाधिक कॉल झाल्याचे समोर आलं. धाकट्या मुलीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध असल्यामुळे रवीदत्त दुबे यांनी त्याला मारहाण केली होती असे पोलीस तपासात समोर आले आहे.


बॉयफ्रेण्डच्या मित्राकडून खून पुष्पेंद्र हा धाकट्या मुलीच्या बॉयफ्रेण्डचा मित्र होता. पैसे देऊन तिने पुष्पेंद्रला वडिलांची हत्या करण्यासाठी तयार केले होते. घटनेच्या रात्री जेव्हा सर्वजण झोपी गेले तेव्हा धाकट्या मुलीने पुष्पेंद्रला वीदत्त यांच्या खोलीत नेलं. तिथे त्यांची गोळी झाडून हत्या केल्यानंतर तो पसार झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिने आपला गुन्हा कबुल केला आहे.

RELATED ARTICLES

देश विदेश

महाराष्ट्र

राजकीय घडामोडी

Most Popular

Join our WhatsApp group